लेख-समिक्षण
  • 17 Aug 2025

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4199

TimeLine Layout

August, 2025

  • 10 August

    भारत झुकेगा नही…

     अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या चमकदार उंचीवर पोहोचेल, अशी जी अपेक्षा होती, ती १ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आणि ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलखरेदीचे कारण पुढे करत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्कआकारणी जाहीर केल्यामुळे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी …

    Read More »
  • 10 August

    जेटिनल फीचर मॅपिंगची किमया

    हासन लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू असलेल्या प्रज्वल रेवण्णा याला नुकतेच बेंगळुरू येथील विशेष कोर्टाने बलात्काराच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. हे प्रकरण केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर न्यायवैज्ञानिक पातळीवरही ऐतिहासिक ठरले कारण भारतात पहिल्यांदाच जेनिटल फीचर मॅपिंग या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन साक्ष म्हणून करण्यात आला. प्रकरणाची …

    Read More »
  • 3 August

    किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा

    मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच …

    Read More »
  • 3 August

    संवेदनशील दिग्दर्शकाची जन्मशताब्दी

    भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्‍या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू …

    Read More »
  • 3 August

    नैराश्याने मेंदूचे आकुंचन

    निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …

    Read More »
  • 3 August

    डास माणसाकडे का आकर्षित होतात?

    डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार …

    Read More »
  • 3 August

    लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!

    कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. हवा आणि नद्या शुद्ध झाल्याची अनेक उदाहरणे त्यानंतरच्या काळात समोर आली होती. मात्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. आता संशोधकांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते! लॉकडाऊन काळात …

    Read More »
  • 3 August

    निःस्वार्थी मेहनत वाया जात नाही!

    अ‍ॅलिस ऑगस्टा बॉल ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विज्ञानाच्या इतिहासात झळाळणारी संशोधिका. १८९२ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या या तरुणीला अतिशय कमी आयुष्य मिळूनही मानवी समाजासाठी तिने अमूल्य कार्य करून दाखवले. लहानपणापासूनच ती हुशार, जिज्ञासू आणि परिश्रमी होती. रसायनशास्त्रातील तिला असलेली गोडी पाहता तिने आपल्या शिक्षणाचा संपूर्ण भर विज्ञानावरच ठेवला. हवाई विद्यापीठातून तिने मास्टर्स पदवी मिळवली आणि ती या विद्यापीठाची पहिली महिला तसेच …

    Read More »
  • 3 August

    खर्‍या अर्थाने स्वच्छता दूत

    शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …

    Read More »
  • 3 August

    चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’

    नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे. तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि …

    Read More »