निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला …
Read More »TimeLine Layout
September, 2024
-
15 September
रियल हिरो
कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …
Read More » -
15 September
वायूप्रदुषणाबाबत स्वागतार्ह उपक्रम
देशातील अनेक शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. पावसाळ्यात किंवा इतर महिन्यात पाऊस पडला की प्रदुषणापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळतो, पण या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे. या प्रयत्नात, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातील दोन शहरांना आणि ओडिशातील भुवनेश्वरमधील काही भागांना कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणून निवडण्यात येणार आहे. या भागात अत्यंत कमी उत्सर्जन असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला …
Read More » -
15 September
देर है…
भ्रष्टाचार हा शब्द कुणी उच्चारला तर हसू येईल की काय, अशी भीती वाटू लागलीय. मुळात तो कुणी उच्चारल्यास त्यातल्या त्यात खरा वाटेल, हा प्रश्न पडतो. आपण स्वतः सोडून कुणाचीही याविषयी बोलायची लायकी नाही, असंच प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाचे पाय मातीचे. हजारो कोटींचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर येऊन टीआरपी खाऊन गेले. पुराव्यांच्या राशीच्या राशी डोळ्यांसमोर दिसता-दिसता नजरेआड झाल्या. कुणी ट्रकमधून, कुणी बैलगाड्यांमधून …
Read More » -
15 September
देशात पुन्हा सांप्रदायिक आग
गणपती विसर्जनावेळी कर्नाटकातील नागमंगला शहरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हाणामारी झाली आणि मग हिंसाचाराला सुरुवात झाली. यावेळी दगडफफेक करून अनेक दुकाने, वाहने पेटवली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत आंदोलन सुरू …
Read More » -
15 September
मणिपूर ‘वाचवायचे’ तर…
मणिपूर सरकार, सुरक्षा दल आणि केंद्र सरकार सध्या हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष भोवर्यात अडकले आहे. गुप्तचर संघटनांना मणिपूरमधील ताज्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात अपयश आले किंवा प्रत्युत्तराची बाजू कमी पडली असे म्हणावे लागेल आणि अर्थातच ही बाब दुर्देवी आहे. कुकी आता केवळ वेगळे राज्यच नाही तर वेगळा देश कुकीलँड मागत आहेत. त्यात संपूर्ण ईशान्य आणि बांगलादेशचा काही भागाचा समावेश करत आहे. दुसरीकडे नागा …
Read More » -
15 September
बघ्यांच्या गर्दीत हरवल्या संवेदना
‘क्रांतिवीर’ चित्रपटातला ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..’. हा संवाद लोकप्रिय झाला. पण सध्याच्या काळात मोबाईलमध्ये व्यग्र झालेल्या आणि रीलमध्ये आकंठ बुडालेल्या समाजाला तंतोतंत लागू पडतो. अपघाताच्या ठिकाणी, दुर्घटनेच्या स्थळी, अत्याचार, अन्याय होत असताना ते रोखण्याऐवजी त्याचे शूटिंग करण्याची मानसिकता ही अशा विकृतीला नकळतपणे प्रोत्साहन देत आहे. सोशल मीडियात हरविलेल्या समाजात हत्या, हल्ला, अपघात, मृत आणि जखमी लोक हे …
Read More » -
8 September
अमृताचा रहस्यपट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ’आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि …
Read More » -
8 September
पुन्हा डर्टी पिक्चर !
मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही. मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. अहवालातील गौप्यस्फोटाच्या आवाजाने …
Read More » -
8 September
डोन्ट फेसबुक युवर प्रोब्लेम्स
‘फेस युवर प्रॉब्लेम, डोन्ट फेसबुक यूवर प्रॉब्लेम्स’, असे म्हटले जाते. सोशल मिडियामुळे जेवढे फायदे होत आहेत, तेवढेच नुकसानही सोसावे लागत आहे. फेसबुक, ट्विटर किंवा व्हाटसअपसारख्या मिडियातून एखादी चुकीची बाब आपल्याकडून पोस्ट झाली किंवा चित्र व्हायरल झाले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि नको त्या गोष्टीत अडकण्याची भीती असते. काही मंडळी सोशल मिडियाला अकारण दोषी धरतात. याउलट सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने …
Read More »