राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही. सभापती हे पक्षपाती भूमिका घेत वावरत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारीही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात …
Read More »विशेष
कृषीविकासाला हवी चालना
चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आले, तेव्हा सर्वात प्रथम कृषी पायाभूत सुविधांचा विकास झाला. अमेरिकेचे दूरदर्शी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनीही शेतीला विकासाचा आधार बनवला होता. यातुलनेत भारतात कृषी विकासाबाबत भरीव प्रयत्न झाले नाहीत. देशातील सुमारे दोन हजार लाख हेक्टर जमीन शेतीसाठी योग्य आहे. यापैकी केवळ 1,200 ते 1,500 लाख हेक्टर जमीन वापरण्यायोग्य आहे. यातील केवळ 40 टक्के जमीन सिंचनाखाली येते. उर्वरित 60 टक्के …
Read More »सत्ता येताच लाडकी बहीण बनली दोडकी
महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …
Read More »पुन्हा देवेंद्रपर्व
विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या …
Read More »गरज सुधारणांची
देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात जून 1997 मध्ये झाली. त्याआधीही देशात अन्नधान्य वितरणासाठी व्यवस्था होती, पण ती मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी होती. देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्देश गरजू आणि गरीब लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित करणे हा होता. सप्टेंबर 2013 मध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने या प्रणालीला एक नवी दिशा दिली. तथापि, आयसीआरआयईआरच्या अभ्यासानुसार, दरवर्षी 20 दशलक्ष टन अन्नधान्य …
Read More »अखेर फडणवीस पुन्हा आले…
2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आले आहेत. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून मला फडणवीस यांनी सहकार्य केले, असे शिंदे म्हणाले. त्यानंतर भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचे सोपस्कार पूर्ण केले. दोन दिवस माध्यमांशी न बोललेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी …
Read More »राजकीय बदलांची नांदी
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांना मत देणे अधिक महत्त्वाचे वाटले. अलिकडचे निकाल पाहता मतदारांचा बदलता ट्रेंड पाहून प्रादेशिक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या राज्यांत भाजप आणि कॉग्रेसचा स्ट्राईक रेट अधिक आहे, तेथे लहान पक्षांना उमेदवार निवडून आणताना बराच आटापिटा करावा लागला. राष्ट्रीय पक्षांचा वाढता दबदबा येणार्या काळातील राजकीय बदलांची नांदी म्हणावा लागेल. यंदाच्या …
Read More »नव्या आर्थिक चिंताचा काळ
रेंगाळणारे रशिया युक्रेन युद्ध आणि इस्राईल-इराण संघर्ष या कारणांमुळेही भारताच्या आर्थिक चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. जगातील युद्धग्रस्त देशातील संघर्ष आणखी चिघळला तर तर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढण्याची मालिका सुरू होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या तर जगभरात अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याबरोबरच भारतात देखील महागाई मी मी म्हणू शकते. सध्या देशात महागाई भडकण्याचा ट्रेंड हा स्पष्टपणे दिसत …
Read More »महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …
Read More »झोल नाही, ‘ सेल्फ गोल ’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील विभक्त झालेले गट असल्यामुळे यावेळच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पण निकालांनी …
Read More »