इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन स्पेडेक्स मिशन ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही तर ते अंतराळातील भारताचे योगदान देखील दर्शवते. ही एक नवीन उपलब्धी आहे. या मिशनचे मुख्य कार्य दोन अंतराळ यानांना डॉक करणे (जोडणे) हे आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे कौशल्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. डॉकिंग तंत्रज्ञान ऊर्जा पर्यायांवर तसेच उच्च-तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालींवर आधारित आहे. केवळ सध्याच्या मोहिमांसाठीच महत्त्वाचे …
Read More »कव्हर स्टोरी
एका पर्वाची अखेर
भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक …
Read More »मुद्यांपासून भरकटलेले अधिवेशन
नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आतापर्यंत जे काही पाहायला मिळाले त्यावरुन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेली अविश्वास प्रस्तावाची नोटीस ही भारतीय संसदेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. या प्रस्तावाचा सरळसरळ अर्थ देशाच्या उपराष्ट्रपतींवर अविश्वास व्यक्त करणे आहे. संविधानावरील चर्चा असेल किंवा अदानींचा मुद्दा असेल, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कामकाजाबाबत …
Read More »कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या अपेक्षापूर्तीसाठी…
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही. सभापती हे पक्षपाती भूमिका घेत वावरत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारीही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात …
Read More »पुन्हा देवेंद्रपर्व
विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या …
Read More »राजकीय बदलांची नांदी
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांना मत देणे अधिक महत्त्वाचे वाटले. अलिकडचे निकाल पाहता मतदारांचा बदलता ट्रेंड पाहून प्रादेशिक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या राज्यांत भाजप आणि कॉग्रेसचा स्ट्राईक रेट अधिक आहे, तेथे लहान पक्षांना उमेदवार निवडून आणताना बराच आटापिटा करावा लागला. राष्ट्रीय पक्षांचा वाढता दबदबा येणार्या काळातील राजकीय बदलांची नांदी म्हणावा लागेल. यंदाच्या …
Read More »झोल नाही, ‘ सेल्फ गोल ’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील विभक्त झालेले गट असल्यामुळे यावेळच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पण निकालांनी …
Read More »फटाफुटीची भाषा कशासाठी?
सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …
Read More »सुरुक्षित पदार्पण
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान …
Read More »विकसित भारतासाठी
भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …
Read More »