लेख-समिक्षण

विशेष

अर्बन नक्षलवर प्रहार

काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

Read More »

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

Read More »

चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

Read More »

१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता

राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उद्योग विभागांतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत व विकसनशील …

Read More »

श्रीमंतीदर्शनाचा हुकमी एक्का

माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा असला तरी मानवीसमूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे हे दाखवण्याची मानसिकता त्याच्यात असते. यासाठी जमेल त्या मार्गाने आपल्या सामर्थ्याचे, संपत्तीचे दर्शन घडवणारे अनेक जण समाजात दिसतात. यामध्ये आलिशान गाड्या, भव्यदिव्य विवाहसोहळे, याबरोबरीने वाहनांसाठीच्या व्हीआयपी नंबरप्लेटही मोलाची भूमिका बजावतात. भारतात अलीकडील काळात या नंबरप्लेटसाठी हजारो नव्हे तर लाखो रुपये मोजण्यास तयार असणारा एक वर्ग तयार झाला आहे. …

Read More »

कहाणी कोल्हापुरी चप्पलचोरीची

भारतात धार्मिक आयोजनात किंवा धार्मिक स्थळाबाहेर चप्पल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. काहीवेळा चप्पल चोरी ही हसण्यावरी नेण्यात येते. मात्र भारताच्या-विशेषतः महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची चोरी ही एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीने केली आहे. ही चोरी वस्तुरुपातून नसून त्याच्या मालकीची, स्वामित्वाची आहे. यावर माध्यमातून आवाज उठविल्यानंतर कंपनीने रॅम्पवॉकमध्ये वापरलेली चप्पल ही याबाबत तातडीने कोल्हापुरी चप्पलेपासून प्रेरणा घेतच तयार केलेली होती, हे …

Read More »

अंतराळवीर शुभांशू शुलांनी रचला इतिहास

१९८४मध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे अवकाश मोहीमेवर गेले होते. त्यानंतर आता भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुला यांनी २५ जून रोजी दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला. शुभांशू शुला यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘अ‍ॅसिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आहे. नासाचे फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावले आणि …

Read More »

गुणांची शर्यत आणि स्पर्धकाचा बळी

केवळ सरावपरीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतःच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंट्या ने जबर मारहाण केली. बापाच्या या नृशंस आणि विकृत कृत्याने त्या चिमुरडीचा अंत झाला. विशेष म्हणजे मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक आहे. अर्थात ही पहिली घटना नाहीये. अधिकाधिक गुण मिळायलाच हवेत, यासाठी बालमनांवर सतत दबाव आणणारे आणि त्यांना तणावग्रस्त बनवणारे असंख्य पालक आज समाजात आहेत. आपले पाल्य …

Read More »

नौदल सामर्थ्याला नवी बळकटी

‘तमाल’ या रशियात तयार झालेल्या अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र युद्धनौकेचा भारतीय नौदलात लवकरच समावेश होणार आहे. रशियातील कैलिनिनग्राद येथे पार पडणारी ही घटना भारताच्या सागरी धोरणाचा, सामरिक ताकदीचा आणि जागतिक भागीदारीतील दृढ नात्याचा उल्लेखनीय टप्पा ठरणार आहे. ही युद्धनौका केवळ सागरी सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षणसंबंधांचे ठोस प्रतीकही आहे. तीन महिने चाललेल्या समुद्री चाचण्यांमध्ये या नौकेने आपल्या प्रणाली, …

Read More »

३ हजारांमध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जगभर फिरत असतात. तेथून काही आयडिया घेऊन भारतात येतात आणि आपल्या मंत्रालयामार्फतत्या राबवित असतात. आता अशीच एक नवीन आयडिया आणली असून ती देशभरात १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त …

Read More »