लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …

Read More »

स्वागतार्ह पाऊल

राजकीय गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीचे होत असलेले वस्त्रहरण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला यासंदर्भात जाब विचारुन लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद आणि विधानसभांच्या स्वच्छतेसाठीचे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली निघावी आणि दोषी नेत्यांवर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली …

Read More »

झोपडपट्टयांची मुंबई

मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्‍यांचा दृष्टिकोन इथल्या …

Read More »

सुरक्षेवर लक्ष कधी ?

प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी …

Read More »

ट्रम्प आणि फडणवीस

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी यांचे पाच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदी पुनरागमन झाले. तसेच पुनरागमन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे चार वर्षांनंतर झाले आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांनी जाणीवपूर्वक नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. तिकडे अमेरिकेत ट्रम्प यांनी पदग्रहणाआधीच कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य करण्याचा, ग्रीनलँड व पनामा कालव्यावर नियंत्रण मिळविण्याचा आणि मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात करण्याचा मनोदय जाहीरपणे त्यांनी …

Read More »

पंतप्रधानांचा कानमंत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी …

Read More »

कायदा-सुव्यवस्थेची चिंता

दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण एकमेकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांवरून शुभेच्छा देत असतो. गेल्या वर्षीही म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी अशाच शुभेच्छा एकमेकांना दिल्या होत्या. हे वर्ष कसे गेले सर्वांनीच पाहिले आणि अनुभवले. 2024 हे वर्ष महिला अत्याचार, गुन्हेगारी, राजकीय कुरघोडी आदी कारणांसाठीच जास्त चर्चेत राहिले. त्यातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा हंगामही पाहिला. दोन्ही निवडणुकांचे …

Read More »

नैतिक अधःपतन

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यातून होणार्‍या हत्या या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे भीषण दर्शन आहे. राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराने आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह ड्रममध्ये लपवण्यात आल्याच्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वासना भागवण्यासाठी लहान बालिकांची अतिशय अमानुष हत्या करणारा नराधम व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरतोच कसा? त्याच्या काही दिवस …

Read More »

खातेवाटपाचे उणे-अधिक

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना …

Read More »

मानाचा तुरा

मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली आहे. एक …

Read More »