आजकाल प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरतात. पण बरेच लोक हे जाणत नाहीत की सर्व टेम्पर्ड ग्लास सारख्या नसतात. जर चुकीची ग्लास निवडली, तर तुमची स्क्रीन सुरक्षित राहणार नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात जसे की टूडी, २.५ डी, ५ डी, ११ डी वगैरे. यांपैकी प्रत्येकाचे डिझाइन, कव्हरेज आणि सुरक्षा पातळी वेगळी असते. उदाहरणार्थ, …
Read More »युवा
सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स
प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे. खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा …
Read More »पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे …
Read More »तुमचा फोन हैक झाला आहे का?
फोन हॅक करून त्या फोनमधील डेटा दुसरीकडे पळवला जातो व त्याआधारे सायबर फ्रॉड केले जातात. फोन हॅक झाला आहे का ते ओळखण्यासाठी फोनच्या डायलरमध्ये जाउन ‘स्टार हॅश ६७ हॅश’ डायल करा. दोनचार सेकंदात एक लिस्ट स्क्रीनवर दिसेल. त्यात कॉल, डेटा, मेसेजेस इ.फॉरवर्ड होत आहेत का ते कळेल. यातले एखादे फॉरवर्ड होतंय कळल्यावर डायलरमध्ये जाउन हॅश हॅश ००२ हॅश डायल करा. …
Read More »व्हॉटसअॅप चॅटस् सुरक्षित ठेवण्यासाठी….
गेल्या काही महिन्यांत व्हॉटसअॅप चॅट्स आणि डेटा लीक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक चॅटस् सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक झाले आहे. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्या खासगी चॅटस्ना सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर यासाठी काही टिप्स जाणून घ्या. यामुळे तुमचे चॅटस् लीक होण्याची शयता जवळजवळ शून्य होईल. व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लॉक नावाचे एक फीचर आहे. याच्या …
Read More »पर्यावरणपूरक उद्योगभरारीचा आदर्श
दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्या सूताचा …
Read More »खर्या व्यक्तिमत्त्वाचा शोध
आजचा तरुण झपाट्याने बदलणार्या जगाशी स्पर्धा करत आहे. सोशल मीडियावर चमक, करिअरची धावपळ, सतत तुलना… अशा गोंधळात एक गोष्ट हरवतेय ती म्हणजे खरं व्यक्तिमत्त्व. खर्या यशाची सुरुवात बाहेरच्या जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. काहींना वाटतं की चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्टायलिश दिसणं, इंग्रजीत फटाफट बोलणं किंवा लोकांच्या समोर आत्मविश्वासानं वावरणं. खरं पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे र्तनातली प्रामाणिकता, मनातली शिस्त, …
Read More »एआय आणि पालकत्व
जच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सर्वदूर होत आहे. आज अनेक जण त्याचा वापरही करत आहेत आणि लाभही घेत आहेत. पण आपण पालकत्वासंदर्भात या नवतंत्रज्ञानाकडे कधी पाहिले आहे का? नसेल ना? वास्तविक, योग्य प्रकारे वापर केल्यास एआयची संगोपनादरम्यान खूप मोठी मदत होऊ शकते. अर्थात त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळणे गरजेचे आहे. कसा करता येईल उपयोग? १. शिक्षण …
Read More »पाच वेळा अपयश येऊनही…
आयआयटी पदवीधर विशाल नरवडे यांनी युपीएससी परीक्षा पाच वेळा दिली आणि दरवेळी अपयश आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात ९१वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. भारतात युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं हे लाखो तरुणांचं स्वप्न असतं. या परीक्षेचा प्रवास अत्यंत कठीण आणि चढ-उतारांनी भरलेला असतो. परंतु सातत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर …
Read More »बारावीनंतरचे मिशन पार पाडताना…
बारावी झाली… आता पुढे काय? हे वाय आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात घोळतंय. परीक्षा संपली, निकाल लागला आणि आता करिअरची दिशा ठरवायची वेळ आली आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ जितकी उत्साही वाटते, तितकीच गोंधळात टाकणारीही असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात, आणि स्वप्नांच्या दिशा शोधू लागतात. महाराष्ट्रातले उदाहरण सांगायचं झालं, तर एमएचटी- सीईटी …
Read More »