लेख-समिक्षण

इनर स्टोरी

झळा पाणीटंचाईच्या

नवीन वर्षात जानेवारी 25 पासूनच राज्यात अनेक जिल्ह्यात गावोगावी वाड्यांवर महत्त्वाच्या शहरात तेथील अनेक सोसायट्या दरम्यान, गृहप्रकल्पात टँकर फेर्‍या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई महानगर सुद्धा याला सध्या अपवाद नाही. आज अनेक वर्षापासून भूगर्भातले पाणी उपसणे नियंत्रणात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात असून त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या धरणांमधील सातत्याने पाणी कमी होऊ लागल्याचे अत्यंत विदारक …

Read More »

साक्षर राज्यातलं भेदक वास्तव

निसर्गानं मुक्त हस्तानं वरदान केलेल्या केरळ राज्यात सोनेरी भविष्याच्या शोधात आखाती देशांमध्ये जाण्याची स्पर्धा आहे. या राज्यात प्रत्येक पाचव्या घरातून एक व्यक्ती परदेशात गेली आहे. परदेशातून येणार्‍या ‘रेमिटन्स’मुळे केरळमधील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. गावागावात भव्य घरं, आधुनिक गाड्या आणि शहरी जीवनशैली दिसू लागली. पण ही उन्नती एकाकीपणाची सावली घेऊन आली. तरुण मुलं-मुली शिक्षण पूर्ण होताच परदेशात गेले आणि गावात …

Read More »

अवकाळीनं मोडले कंबरडे

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वार्‍यांचा संगम होऊन मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले. या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 1400 हेक्टरवरील पीकाला याचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकर्‍यांचे …

Read More »

वादळ बेताल ‘ग्रोक’ चे

भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न …

Read More »

थकबाकीचे ‘जड झाले ओझे’

गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परिणामी, बँकिंग क्षेत्रापुढे, खास करुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये वाढत्या थकबाकीचे आव्हान निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, जानेवारी 2025 अखेर भारतातील एकूण क्रेडिट कार्ड थकबाकी 2.9 लाख कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षभरात 13 टक्क्यांनी वाढली आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील सरासरी क्रेडिट कार्ड थकबाकीचे …

Read More »

‘शिवशाही’ची दारुणावस्था

आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्‍या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद …

Read More »

दीदींचे फासे, भाजपचे उसासे!

हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले …

Read More »

थरुरांचे काय होणार?

केरळमधील काँग्रेसचा चेहरा असणारे शशी थरूर हे सध्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेवरून चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासमवेतच्या सेल्फीने ते पुन्हा राजकीय वादात सापडले आहेत. शिवाय काँग्रेसही गेल्या काही वर्षांपासून थरूर यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेताना दिसत नाही. आता केरळची विधानसभा निवडणूक दीड वर्षावर आलेली असताना भाजपचे नेते तेथे सत्ता मिळवण्यासाठी थरुर यांना आपल्या तंबूत ओढतील का? असा प्रश्न …

Read More »

कायद्याने ‘हमी’ मिळेल?

भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जगभरातील मागणीच्या तुलनेत वीस टक्के पुरवठा भारतातून केला जातो. अमेरिकेला 40 टक्के आणि ब्रिटनला 25 टक्के औषधी भारतातून जातात. 2018-19 मध्ये देशातून सुमारे 1,920 कोटी डॉलरच्या औषधांची निर्यात करण्यात आली. आता केंद्र सरकार रुग्णांना स्वस्तात औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णांसाठी ब्रँडेड नाही तर …

Read More »

व्यवस्थापनाचा ‘कुंभ’ रिकामाच!

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे …

Read More »