लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

अर्बन नक्षलवर प्रहार

काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

Read More »

१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता

राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उद्योग विभागांतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत व विकसनशील …

Read More »

अंतराळवीर शुभांशू शुलांनी रचला इतिहास

१९८४मध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे अवकाश मोहीमेवर गेले होते. त्यानंतर आता भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुला यांनी २५ जून रोजी दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला. शुभांशू शुला यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘अ‍ॅसिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आहे. नासाचे फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावले आणि …

Read More »

३ हजारांमध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जगभर फिरत असतात. तेथून काही आयडिया घेऊन भारतात येतात आणि आपल्या मंत्रालयामार्फतत्या राबवित असतात. आता अशीच एक नवीन आयडिया आणली असून ती देशभरात १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त …

Read More »

विमान कोसळून २६१ जण ठार

गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून …

Read More »

चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू

१८ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र हा विजय मृत्यूचे तांडव घेऊन आला. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२५ च्या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक लोक जखमी झाले. अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी …

Read More »

राज्यात अतिवृष्टीने २१ जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारला दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे दाणादाण उडाली असताना या वाईट हवामानाचा फटका मुंबई-अमरावती फ्लाईटला बसला. त्याच वेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या …

Read More »

छत्तीसगडमध्ये २७ नक्षली ठार

छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …

Read More »

अमरावतीच्या सुपुत्राने घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे मंगळवार १३ मे रोजी निवृत्त झाले. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी …

Read More »

भारताने घेतला पहलगामचा बदला

पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …

Read More »