लेख-समिक्षण

संपादकीय

गिलचा झंझावात

इंग्लंडविरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …

Read More »

पैशाचा पाऊस!

डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

Read More »

‘डेटा लिक’चा वाढता धोका

काळानुसार सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग आणि चोरी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यापासून कोणीही वाचू शकत नाही, असे म्हटले जात आहे. मग एखाद्याने चूक केलेली असो किंवा नसो. एवढेच नाही तर या सायबर गुन्हेगारांनी पोलिसांना देखील सोडलेले नाही. खात्यातून पैसे गायब करण्याबरोबरच संवेदनशील माहिती चोरण्यासाठी अहोरात्र काम करणारे सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सजगता हवीच, त्याचवेळी ऑनलाइन असताना …

Read More »

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता …

Read More »

‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची

राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेले हे महामंडळ गत ४५ वर्षांत फक्त ८ वेळाच नफ्यात होते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या घोषवाक्यांसह मिरवणारे हे महामंडळ सध्या १० हजार कोटींच्या वर संचित तोटा सहन करत आहे. महामंडळाची प्रकृती सुधारण्यासाठी, महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली …

Read More »

क्लस्टर बॉम्बचा थरार

इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष नुकताच शमला. पण या संघर्षात इराणने लस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आहे.हा बॉम्ब सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्यासाठी ओळखला जातो. लस्टर बॉम्ब म्हणजे काय? लस्टर बॉम्ब हा अनेक लहान बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर टाकण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हा बॉम्ब थेट लक्ष्यावर स्फोट करण्याऐवजी हवेतच उघडतो आणि संपूर्ण भागात छोटे-छोटे बॉम्ब टाकतो. हे …

Read More »

‘चोकर्स’चा शिक्का पुसला

यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशा वेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची …

Read More »

विद्यार्थीहितैषी पाऊल

भारतातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहतात. विशेषतः ग्रामीण व दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांसाठी शिक्षण कर्ज घेणे हे एक जटिल व कठीण प्रक्रिया ठरते. शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे आणि आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन असताना त्याचा दरवाजा जर आर्थिक अडचणींमुळे बंद राहत असेल, तर ते देशाच्या मानवी संसाधनावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरते. यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे. …

Read More »

पद पाकिस्तानला, धक्का भारताला

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रांच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुखपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे. या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरल्या आहेत की, भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी तिकडे गेली होती, त्यांचे हे दौरे सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद …

Read More »

‘दहशतवादी’ बुरशी

मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. …

Read More »