लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

जपानमधील प्रकाशाचे गूढ

नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्‍या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले ! घरातून बाहेर पडताच त्याने …

Read More »

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण

मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन …

Read More »

कोवळ्या उन्हाचे आरोग्यलाभ

उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत, मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात, यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन …

Read More »

वेळेच्या नियोजनातून ध्येयपूर्ती

हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, …

Read More »

दीडशे किलोंचे ‘सॅटेलाईट ड्रोन’

ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्‍या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. ‘पीएचएएसए-35’नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे. सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या …

Read More »

टाटांची जीवनमूल्ये

भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्‍या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणार्‍या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच …

Read More »

सर्वात मोठा शॉपिंग मॉल

जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या …

Read More »

आदर्श राष्ट्रनिष्ठेचा

शिरीषकुमार हे बाल क्रांतिकारक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा …

Read More »

हिरा बनणार 15 मिनिटांत?

जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा, साहजिकच हिर्‍यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरित्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्‍यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज …

Read More »

निरीक्षणशक्ती महत्वाची

जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …

Read More »