लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

निरीक्षणशक्ती महत्वाची

जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …

Read More »

शिक्षण सहावी, पण कमाई कोटीत…

सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य बनू शकतो, हे चेन्नईच्या जे हजा फुन्यामिन यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या व्यक्तींने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे गाठलेली असतात. मग ते बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जे हजा फुन्यामिन यांनी चेन्नईच्या रस्त्यावरून सामोसे विकत आज आलिशान वातानुकुलीत …

Read More »

रियल हिरो

कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …

Read More »

कष्टातून फूल वले यशाचे अंगण

श्रीकांत बोल्लापल्ली यांची कथा केवळ एक यशस्वी उद्योजकाची नाही, तर ती एका अशा व्यक्तीची आहे ज्याने कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या स्वप्नांना वास्तवात आणले. तेलंगणाच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीकांत यांना लहानपणापासूनच शेतीविषयी विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्या कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती, आणि त्यांना लहानपणापासूनच कष्ट करावे लागत होते. वयाच्या 16 …

Read More »

कोट्याधिश कृषीसखी

दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्‍यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. …

Read More »

बुध्दीमत्तेला कष्टाची जोड

ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा …

Read More »

डॉ.साराभाईंची शिकवणूक

डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्‍या साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी 1937 मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते …

Read More »

कहाणी जगावेगळ्या अब्जाधिशाची

रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅनसन 1970 सालात वीस वर्षाचा होता. पण डोक्यात स्वतःच व्यवसाय करायचा असे वारे शिरले होते. त्यांनी लोकांच्या घरी पार्सलने रेकॉर्ड पोहोचवण्याचा व्यवसाय करून पाहायचा असे ठरवले. त्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट वर एक दुकान उघडले. तेव्हा निर्यातीच्या दर्जाच्या रेकॉर्डस विकण्याच्या प्रयत्नात चौकशी करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाता-जाता राहिले कारण ब्रॅनसनने 33 टक्के कर चुकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी …

Read More »

टॉलस्टॉय आणि ती

जगप्रसिद्ध रशियन लेखक आणि तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म 9 सप्टेंबर 1828 या दिवशी एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘वॉर अँड पीस.’ मास्कोतील साहित्यप्रेमींना वाटते, की लिओ टॉलस्टॉय यांचा आपण मोठा सन्मान करावा. साहित्यप्रेमी त्यांच्या गावी जातात आणि निमंत्रण देतात. मॉस्कोला येण्यासाठी रेल्वेच्या तृतीय शेणीच्या डब्यात टॉलस्टॉय बसतात. अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या …

Read More »

झुंजार रणरागिणी

आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म डॉ. एस. स्वामीनाथन व अम्मू या दाम्पत्यापोटी 24 ऑक्टोबर 1914 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई काँग्रेसच्या एक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. 1928 मध्ये लक्ष्मी आईबरोबर कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या. अधिवेशनावेळी सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन सादर केले होते. …

Read More »