मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन …
Read More »चिंतन – प्रबोधन
वेळेच्या नियोजनातून ध्येयपूर्ती
हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, …
Read More »टाटांची जीवनमूल्ये
भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणार्या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच …
Read More »आदर्श राष्ट्रनिष्ठेचा
शिरीषकुमार हे बाल क्रांतिकारक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा …
Read More »निरीक्षणशक्ती महत्वाची
जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …
Read More »शिक्षण सहावी, पण कमाई कोटीत…
सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य बनू शकतो, हे चेन्नईच्या जे हजा फुन्यामिन यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या व्यक्तींने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे गाठलेली असतात. मग ते बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जे हजा फुन्यामिन यांनी चेन्नईच्या रस्त्यावरून सामोसे विकत आज आलिशान वातानुकुलीत …
Read More »रियल हिरो
कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …
Read More »कष्टातून फूल वले यशाचे अंगण
श्रीकांत बोल्लापल्ली यांची कथा केवळ एक यशस्वी उद्योजकाची नाही, तर ती एका अशा व्यक्तीची आहे ज्याने कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या स्वप्नांना वास्तवात आणले. तेलंगणाच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीकांत यांना लहानपणापासूनच शेतीविषयी विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्या कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती, आणि त्यांना लहानपणापासूनच कष्ट करावे लागत होते. वयाच्या 16 …
Read More »कोट्याधिश कृषीसखी
दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. …
Read More »बुध्दीमत्तेला कष्टाची जोड
ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा …
Read More »