करण जोहर हा केवळ दिग्दर्शक नाही, तर एक भावनिक निवेदनकर्ताही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने मान्य केलं आहे की बालपणात त्याला मुलखातला नाहीस असं म्हटलं जायचं. त्याच्या आवाजावर, वावरण्यावर आणि हसण्यावर टिका व्हायची. या सामाजिक दडपणातून त्यानं एक वेगळा संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला, जो त्याच्या सिनेमांमधून प्रकट होतो. त्याच्या कथानकांमध्ये पुरुषांचा भावनिक संघर्ष आणि लैंगिक भूमिका या मुद्द्यांचा मूक उल्लेख सतत …
Read More »सिने समिक्षण
विमान अपघातांचे रुपेरी चित्रण
अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे घडले ते केवळ आकड्यांपुरते नव्हते, तर प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यूमागे एक वेगळी कहाणी दडलेली होती. हा पहिला किंवा शेवटचा अपघात नव्हे. आजवर अनेक हृदयद्रावक विमान अपघात झाले असून त्यातील काहींच्या कहाण्या रुपेरी पडद्यावरही दिसल्या. मात्र ज्या सत्य घटनांवर चित्रपट झाले, त्यांच्या कहाण्यांचा …
Read More »बॉलीवूडची पिछेहाट, ‘साऊथ’ सुसाट
असं म्हटलं जातं की जगात फक्त सातच कथा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा-पुन्हा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये सातच चेहरे वारंवार समोर येतात. अक्षय कुमार, तिन्ही खान, दीपिका पदुकोण, कपूर कुटुंब आणि करण जोहर. हे लोक एकाच कथेला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगतात. ही म्हण अलीकडे खरी ठरली, जेव्हा ‘हाऊसफुल ५’च्या ओपनिंग शोच्या वेळी पीव्हीआर ऑडिटोरियम पूर्णतः ओस दिसले. वरवर पाहता प्रमुख …
Read More »रुपेरी पडद्यावरची ‘बेवफाई’
अलीकडे इंदूरमध्ये जी घटना घडली ती फिल्मी कथानकापेक्षा अधिक रोमांचक आहे. एका पत्नीने लग्नाच्या केवळ दोन आठवड्यांतच आपल्या पतीचा हनिमूनदरम्यान भाडोत्री मारेकर्यांकडून खून करवला. कट असा रचला गेला की पोलिसही थक्क झाले. एक असा थरकाप उडवणारा कट ज्यात प्रेमाचं नाटक होतं, फसवणूक होती आणि खूनदेखील! हा खून अनेक फिल्मी कथानकांची आठवण करून देतो. असं म्हणता येईल की ही घटना चित्रपटसृष्टीतूनच …
Read More »पावसाचे रुपेरी रंग
हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या …
Read More »मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा
कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस …
Read More »नायकांचा बदलता दृष्टिकोन
काळानुसार बदलणे हा मानवी स्वभाव असला आणि हा बदल अपरिहार्य असला तरी त्याला नैतिकतेची, नीतीनियमांची चौकट असावीच लागते. ही चौकट अप्रत्यक्ष असते; पण तिचे परिणाम प्रत्यक्ष असतात. बॉलीवूडमधील नायकांबाबत या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्वीच्या नायकांमध्ये आणि आजच्या नायकांमध्ये एक मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे आज पैसा मिळवण्यासाठी नायकांनी आपल्या स्टारडमचा समाजमनावर होणारा परिणाम हा मुद्दाच विचारात घेणे सोडून दिले …
Read More »ओटीटीचं बदलतं स्वरूप
मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली …
Read More »युद्धकथा-गीतांचे योगदान
हिंदी सिनेसृष्टीने युद्धकथांच्या आधारे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादी भावना, देशनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्राभिमान याबाबत जनसामान्यांना स्फुरण चढवतानाच युद्धाच्या परिणामांबाबतही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. युद्धाचं वातावरण असो वा नसो, युद्धभूमीवर आधारित चित्रपटांच्या कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतात. सीमेवर तैनात सैनिक युद्धभूमीत असोत, जखमी असोत किंवा आपल्या प्रियजनांपासून दूर असण्यामुळे खचलेले असोत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उद्दिष्ट दृढ करण्यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्यासाठी चित्रपटांच्या …
Read More »तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!
अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …
Read More »