लेख-समिक्षण

रविवार विशेष

पैशाचा पाऊस!

डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

Read More »

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता …

Read More »

क्लस्टर बॉम्बचा थरार

इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष नुकताच शमला. पण या संघर्षात इराणने लस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आहे.हा बॉम्ब सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्यासाठी ओळखला जातो. लस्टर बॉम्ब म्हणजे काय? लस्टर बॉम्ब हा अनेक लहान बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर टाकण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हा बॉम्ब थेट लक्ष्यावर स्फोट करण्याऐवजी हवेतच उघडतो आणि संपूर्ण भागात छोटे-छोटे बॉम्ब टाकतो. हे …

Read More »

विद्यार्थीहितैषी पाऊल

भारतातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहतात. विशेषतः ग्रामीण व दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांसाठी शिक्षण कर्ज घेणे हे एक जटिल व कठीण प्रक्रिया ठरते. शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे आणि आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन असताना त्याचा दरवाजा जर आर्थिक अडचणींमुळे बंद राहत असेल, तर ते देशाच्या मानवी संसाधनावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरते. यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे. …

Read More »

‘दहशतवादी’ बुरशी

मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. …

Read More »

उंचीचे रहस्य

मुलीसाठी वरसंशोधन करताना आपल्याकडे उत्पन्न आणि कुंडलीबरोबरच अनेक बाबी तपासल्या जातात. सगळ्यात पहिली बाब असते मुलाची उंची. मुलापेक्षा मुलगीच उंच असेल तर इतर बाबी जुळूनसुद्धा चर्चा पुढे सरकत नाही. सरासरीपेक्षा अधिक उंची असलेल्या मुलीच्या आईवडिलांना ‘हिचं कसं होणार?’ अशी चिंता लागून राहिलेली असते. जगभरात वेगवेगळ्या वंशांचे लोक राहतात आणि त्यांची सरासरी उंची कमी-अधिक असते. परंतु एका बाबतीत संपूर्ण मानवजात एकसारखी …

Read More »

बाटलीतलं भूत

भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं …

Read More »

दंड झाले उदंड

वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …

Read More »

अंतरिक्षातील पहारेकरी

‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …

Read More »

‘झुकानेवाला’ आहेच!

झुकेगा नही…’ असं म्हणणार्‍या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …

Read More »