लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

बंडखोरीला खतपाणी

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल अलीकडे जाहीर झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी तर 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक झाली. तत्कालीन मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विकासाच्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर सुसाट वेगाने पळेल, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला भरभरून मते मिळतील, असा अनेकांचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला बहुमताच्या आसपास जातील एवढ्याही …

Read More »

महासंग्राम निवडणुकीचा

गे ल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या क्षणापासून राज्यात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर होणार असून त्याच …

Read More »

सत्ताधार्‍यांना आरसा

सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेत असलेल्यांना आरसा दाखवला आहे. राज्यांतील विविध राजकीय पक्षांच्या सरकारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दडपशाहीला बळी पडलेल्या पत्रकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी निश्चितच दिलासा देणारी आहे. अनेक राज्यांत पत्रकारांना अटक, मारहाण आणि गंभीर कलमांखाली तुरुंगात टाकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. अनेक पत्रकार संशयास्पद परिस्थितीला …

Read More »

योगनिद्रेवर नवा प्रकाश

हजारो वर्षांची परंपरा असणार्‍या योगचिकित्सेचे महत्त्व निर्विवाद आहे. पण पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाचा असा युक्तिवाद आहे की योगाची चाचणी विज्ञानाच्या आधारे व्हायला हवी. अमेरिका, युरोप आणि विशेषतः चीनमध्ये योगावर मोठे संशोधनही सुरू आहे. काही काळापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालेल्या एका अमेरिकन न्यूरोसर्जनने प्राणायाम हा मानसिक आजारांवर सर्वात प्रभावी उपचार आहे असा दावा केला होता. आज जगभरात योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल …

Read More »

रणरागिणींची नवी भरारी

हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान तेजस उडवणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर्स भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कांठ आणि चतुर्वेदी या सुखोई लढाऊ विमानाचे पायलट आहेत. आतापर्यंत मोहना सिंग मिग फायटर उडवत …

Read More »

‘विशेष’ खेळाडूंची दमदार कामगिरी

भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस अद्याप थांबलेला नाही. पॅरिस येथील पॅरालंपिकच्या बातम्या देशाच्या गौरवात भर घालणार्‍या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी एवढ्या संख्येने भारताच्या पदरात पदके पडलेली नव्हती. अर्थात हा मुद्दा केवळ देशाच्या दिव्यांग खेळाडूंकडून प्रस्थापित केल्या जाणार्‍या विक्रमाचा नसून पॅरिस पॅरालंपिकची पदकांची यादी पाहिली तर ही भारतीयांची बदलणारी मानसिकता आणि दृष्टीकोन याचा एक आदर्श नमूना म्हणावा लागेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

वायूप्रदुषणाबाबत स्वागतार्ह उपक्रम

देशातील अनेक शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. पावसाळ्यात किंवा इतर महिन्यात पाऊस पडला की प्रदुषणापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळतो, पण या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे. या प्रयत्नात, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातील दोन शहरांना आणि ओडिशातील भुवनेश्वरमधील काही भागांना कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणून निवडण्यात येणार आहे. या भागात अत्यंत कमी उत्सर्जन असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला …

Read More »

‘जन-धन’ची दशकपूर्ती

बर्‍याच वेळा साधा वाटणारा उपक्रम नंतरच्या काळात दूरगामी महत्त्वाचा ठरतो. दहा वर्षांपूर्वी जन धन खाते योजना सुरू झाली तेव्हा त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ, सामान्य लोक जर बँक खाते उघडत असतील तर ते खाते किती दिवस चालू ठेवण्याच्या अटींची पूर्तता करू शकतील आणि त्याचा सर्वसामान्यांना तसेच देशाला काय फायदा होईल? आता असे म्हणता येईल की जन धन …

Read More »

शाळांचे वेगवेगळे परीक्षा मंडळ कशासाठी?

देशात विविध राज्यांत असलेल्या परीक्षा मंडळांच्या परीक्षेत एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्य सरकारांशी चर्चा करत असून त्याचे सार्थक परिणाम हाती येणे अपेक्षित आहे. देशभरात सध्या साठपेक्षा अधिक परीक्षा आणि अभ्यास मंडळ आहेत. यात अनेक पातळीवर भिन्नता दिसून येते. या भिन्नतेमुळेच राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या प्रवेश परीक्षेत विद्यार्थी अडचणीत येतात. एक तर देशातील विविध शिक्षण मंडळांचा अभ्यासक्रम वेगळा आहे अणि …

Read More »

ओलींचा भारताकडे वाढता कल

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काठमांडू भेटीचे निमंत्रण दिले आहे. ओली सत्तेत येणे हे भारतासाठी नेहमीच चिंताजनक राहिले आहे. परंतु आता खुद्द ओली यांनीच मोदींना भेटीचे निमंत्रण दिल्याने आगामी काळात भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चीनच्या हातचे खेळणे समजले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आता भारतासमवेत चांगले संबंध …

Read More »