लेख-समिक्षण

ज्ञान-विज्ञान

वातावरणरहित बाह्यग्रहाचा शोध

खगोलशास्त्रज्ञांनी आता पृथ्वीच्या आकाराच्या अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याचे वातावरण त्याच्या तार्‍यापासून येणार्‍या रेडिएशनने नष्ट करून टाकले आहे. अर्थातच, अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, तरीही संशोधकांना या ग्रहामध्ये रस आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आपल्या सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहाची भूगर्भीय रचना जाणून घेण्यासाठी या ग्रहाची मदत होऊ शकते. या बाह्यग्रहाचे नाव ‘स्पेक्युलूस-3 बी’ असे आहे. हा खडकाळ पृष्ठभूमीचा ग्रह …

Read More »

स्नायू बळकटीसाठी खा हेझलनट्स

निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. अनेक जण आहारात ड्रायफ्रूटस्चा समावेश करतात. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की एक ड्रायफ्रूट जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे हेझलनट किंवा पहाडी बदाम. त्याला कुल्ठी किंवा चिलगोजा म्हणून देखील ओळखले जाते. याला काजू आणि बदामांपेक्षाही जास्त शक्तिशाली मानले जाते. विशेषतः जेव्हा शरीराला शक्ती आणि पोषण देण्याची गरज असते, त्यावेळी त्याचे …

Read More »

वार्धक्य रोखायचंय?

वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …

Read More »

कोलेस्टेरॉलमुळे कर्करोग?

कोलेस्टेरॉलमुळे केवळ हृदयविकाराचाच धोका संभवतो असे नाही. मानवी शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उपउत्पादनामुळे एस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांची वाढ होते व परिणामी अनेक प्रकारचे स्तनांचे कर्करोग यामुळे होतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. डुक कर्करोग संस्थेच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, स्टॅटिनसारखी कोलेस्टेरॉल प्रतिबंधक औषधे एस्ट्रोजेनच्या रेणूंचा परिणाम नष्ट करतात. या अभ्यासाने प्रथमच कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण व विशेषत: रजोनिवृत्तीनंतर स्तनांचा कर्करोग यांचा संबंध जोडला …

Read More »

माणूस निर्णय कसा घेतो?

माणसाची बुद्धी ही निश्चयात्मिका असते. याचा अर्थ ती निश्चित काय ते ठरवू शकते. ‘छापा की काटा’ या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील याद़ृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दिपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. माणसाशिवाय अन्यही प्राण्यांमध्ये अशी निर्णयक्षमता असू शकते. न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरद़ृष्टी …

Read More »

आता अन्न पदार्थांचं स्कॅनिंग

सध्या अनेक लोक ‘कॅलरी कॉन्शस’ झालेले आहेत. त्यामुळे समोर आलेल्या अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत, याबरोबरच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होत असते. शिवाय अन्नात अनेक अपायकारक तसेच उपकारक घटकही असतात व ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला आहे. तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अ‍ॅलरजेन, रसायने, …

Read More »

गुहेत सापडला अतिप्राचीन पूल

स्पेनच्या एका बेटावरील गुहेत संशोधकांना तब्बल 5600 वर्षांपूर्वीचा मानवनिर्मित पूल आढळून आला आहे. गुहेतील पाण्यावर बांधलेल्या या पुलाने अर्थातच संशोधकांचे कुतूहल वाढवले आहे. स्पेनमध्ये मालोर्का नावाचं एक बेट आहे. येथे एका गुहेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल 5600 वर्षेजुना व मानवनिर्मित आहे. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या काळी या गुहेत माणसांचे वास्तव्य होते किंवा …

Read More »

गूढ पृथ्वीच्या पोटातल्या कड्याचे

पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. आता आपल्या पायांखाली हजारो किलोमीटर खोलीवर एखाद्या कड्यासारखी रचना आढळून आली आहे. पाश्चात्त्य देशांमधील डोनट या खाद्यपदार्थासारखी किंवा आपल्याकडील मेदुवड्यासारखी त्याची रचना आहे. हे कड्याच्या आकाराचे क्षेत्र पृथ्वीच्या तरल कोअरच्या आत आहे, जे आपल्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या गतिशीलतेबाबतचे नवे संकेत देते. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कड्याचा शोध घेतला आहे. मध्यभागी पोकळी असलेल्या गोलाकार …

Read More »

‘गुप्तहेर’ माशाचा मृत्यू

हेरगिरीसाठी पशुपक्ष्यांचाही वापर करणे ही काही नवलाईची बाब नाही. त्यामुळे एका पांढर्‍या बेलुगा व्हेल माशालाही असेच रशियाचा ‘गुप्तहेर’ मानले जात होते. या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षेतर वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर …

Read More »

दोन बेटांचा वेळफरक

अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशियाचे असे दोन भाग अतिशय थंड प्रदेेश म्हणून ओळखले जातात. या दोन्हींमध्ये बियरिंग स्ट्रेट अर्थात पाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर दोन अनोखे बेट आहेत. यातील पहिला बेट बिग डायोमिड. हे दोन्ही बेट एकमेकांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत. पण, तरीही या दोन्ही बेटात एक इतका मोठा फकर आहे की, एकमेकांपासून इतके जवळ असताना देखील …

Read More »