लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

महान वैज्ञानिकाची प्रेरक यशोगाथा

मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्‍या फेराडे यांनी पुस्तके वाचून …

Read More »

जिज्ञासेतून उभारली कंपनी आणि…

चेन्नईतील बायोटेक्नॉलॉजी पदवीधर अनिस अहमद यांना लहानपणापासून निसर्ग आणि गार्डनिंगची विशेष आवड होती. नारळसमृद्ध भागात वाढलेले असल्यामुळे त्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाने कोको पीट या संकल्पनेची ओळख झाली. बायोटेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केल्यानंतर अनिस यांनी एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर येथे संशोधक म्हणून काम केले. याच काळात त्यांची कोको पीटविषयीची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी या पदार्थाच्या गुणधर्मांबद्दल सखोल संशोधन सुरू …

Read More »

दुर्लक्षित वैज्ञानिकाची प्रेरक कहाणी

भारताच्या प्राचीन विज्ञानाची जगभरात ओळख करून देणार्‍या वैज्ञानिकांमध्ये डॉ. शिवकर बापूजी तळपदेे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 1895 साली मुंबईच्या चोपट्टी समुद्रकिनारी ‘मरुतसखा’ नावाचे पहिले स्वदेशी विमान यशस्वीरीत्या उडवले. परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पानांत मात्र झाकोळले गेले. प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा शिवकर तळपदेे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वेद आणि संस्कृत ग्रंथ वाचण्याची आवड होती. …

Read More »

पॅडादादांचा सक्सेमंत्र

पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. उत्तम विनोदवीरांच्या यादीत पॅडी दादांचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये पॅडी दादांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रहसनं केली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाविषयी मनोगत मांडलं. ते म्हणतात, लग्नाच्या अगोदर नाट्यक्षेत्रातील माझी परिस्थिती फारशी समरूप नव्हती. घरातल्यांचा नकार होता. कारण, …

Read More »

आकांक्षा पुढती जिथे…

मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर आर्थिक परिस्थिती, शारिरिक व्यंग किंवा कोणतीही अडचण तुमच्या यशाच्या आड येत नाही. भव्य धर्मेश पालेजाच्या कहाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. भव्य स्वत:च्या पायांवर उभा राहू शकत नाही. तरी देखील तो आपल्या कर्तृत्वाने लाखो तरुणांना प्रेरणा देतोय.दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भव्य धर्मेश पालेजाने पहिल्याच टप्प्यात सनदी लेखापाल (सीए) ही परीक्षा उत्तीर्ण केली …

Read More »

यशाचा राजमार्ग

प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले. विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे …

Read More »

आईकडून दहा हजार घेवून व्यवसायाची सुरुवात आज देशात सहाशे दुकाने

रवी मोदी हे कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणितात चांगले होते. त्यांचे वडील कोलकाता येथील एका मार्केटमध्ये किरकोळ दुकान चालवायचे. जिथे मोदी शिकत असताना त्यांच्या वडिलांना मदत करायचे. रवी मोदी इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले होते. रवी मोदी यांच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे …

Read More »

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्‍या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्‍या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची…. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या …

Read More »

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …

Read More »

समर्पितपणाची यशोगाथा

भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते …

Read More »