लेख-समिक्षण

मनोरंजन

राणी पुन्हा शिवानीच्या भूमिकेत

अभिनेत्री राणी मुखर्जीचा ’मर्दानी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलनंतर तिसर्‍या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या ’मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती. ‘मर्दानी’ चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी आहे. …

Read More »

सिनेगीतांना साज लोकसंस्कृतीचा

सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्‍यांचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं …

Read More »

चर्चा सामंथाच्या अफेअरची

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा …

Read More »

गर्भरेशमी स्वरांचा सन्मान

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने अनुराधाताईंच्या गर्भरेशमी स्वरांना गौरवण्यात येणार आहे याचा मनापासून आनंद होत आहे. लतादीदी आणि आशाताई या दोन अजोड आणि जगामध्ये कुठंही न आढळणार्‍या वैशिष्ट्यांमध्ये टिकून राहात आपला वेगळा आवाज निर्माण करण्याचं आव्हान पेलताना अनुराधा पौडवाल यांनी नक्कीच मेहनत घेतली असणार. जवळपास 40 संगीतकारांकडे 300 हून अधिक गाणी आम्ही एकत्र केलेली आहेत. त्या काळात मी त्यांचं समर्पण, शब्दांवरचं …

Read More »

योगिताचा नवरा का संतापला?

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाणला मोठी लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वीच योगिताने मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशीच तिने खर्‍या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. यानंतर सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र बिग बॉसमध्ये वापरल्या जाणार्‍या घाणेरड्या भाषेवरून योगिताच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप …

Read More »

सिनेसृष्टीची पोस्टरबाजी

हॉलिवूड किंवा बॉलिवूडचे असो, चित्रपट हे केवळ जाहीरातबाजी आणि प्रचारामुळे चालतात, हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार हा केवळ पोस्टरच्या माध्यमातून व्हायचा. आजही तितक्याच आक्रमकतेने पोस्टरबाजी, जाहीरातीबाजी होते. अर्थात काळानुसार जाहीरातबाजीचे स्वरुप बदलले आणि स्रोत बदलले. भारतीय चित्रपटाच्या पोस्टरला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी एक पोस्टर तयार करण्यासाठी कलाकाराला बरेच दिवस लागायचे. आजघडीला मात्र काही …

Read More »

सुनिधीने केला पर्दाफाश

गायिका सुनिधी चौहानची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या सुंदर मधुर गाण्याने ती लाखो चाहत्यांना घायाळ करते. बॉलिवूडमधील टॉप गायिकांमध्ये सुनिधीच्या नावाचा समावेश केला जातो. तिने अनेक सिंगिंग रिअ‍ॅॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर आता तिने एका मुलाखतीत रिऍलिटीशोमागचं सत्य सांगितलं आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचं देखील सांगितलं. सुनिधीने …

Read More »

सलाम महानायका…

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘कल्कि 2098 एडी’ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. समीक्षकांच्या मते, अमिताभ बच्चन या चित्रपटात नसते तर त्याने बॉक्स ऑफिसवर मान टाकली असती. खरोखरच अमिताभ बच्चन यांना केवळ अभिनेता नाही तर अभिनयाची ‘पाठशाला’ म्हणजे अभिनयाचे उगमस्थान म्हणता येईल. विशेषत: सत्तरी ओलांडल्यानंतरही अमिताभ बच्चन नव्या कलाकारांसमवेत काम करताना अभिनयाची नवनवीन उंची गाठत आहेत. अमिताभ बच्चन …

Read More »

धनुषने दिले सडेतोड उत्तर

सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता धनुष त्याच्या वक्तव्यामुळे टीकेच्या भोवर्‍यात सापडला आहे. अभिनेत्याचा पुढील चित्रपट ’रायन’ 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रमोशन दरम्यान, धनुषने सांगितले की, तो देखील एक बाहेरचा माणूस (आऊटसाईडर ) आहे आणि त्याने येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यावेळी त्याने पोस गार्डनमध्ये घर घेण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले. …

Read More »

पडद्यावरुन हरपतंय सामाजिक ऐक्य

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात जातीय, धार्मिक सलोखा आणि ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते. विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. यामध्ये चित्रपटांनीही मोठी भूमिका निभावली. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्‍या चित्रपटांची रेलचेल असायची. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे चित्रपट येत राहिले; पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण …

Read More »