लेख-समिक्षण

सिनेचर्चा

अभिनेत्री ते आयएएस

कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …

Read More »

‘हेराफेरी 3’ला पुढील वर्षी सुरुवात

हेरा फेरी-3’ या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? दरम्यान, आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी-3’ च्या पटकथेवर 2026 मध्ये काम केले जाईल. हे एका आव्हानापेक्षा कमी नसेल असेही त्यांनी सांगितले. प्रियदर्शन म्हणाले, ‘मी पुढच्या वर्षी ‘हेरा फेरी-3’ वर काम सुरू करेन. या …

Read More »

‘लापता लेडीज’ची कथा चोरलेली?

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. बुर्का सिटी नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकर्‍यांनी किरण रावला …

Read More »

कमाईचा नवा विक्रम

विक्की कौशलचा ’छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली विजयी घोडदौड कायम ठेवून आहे. रेकॉर्ड तोडण्याची त्याची भूक अद्याप संपलेली दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सहाव्या वीकेंडनंतरही जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 39 दिवस पूर्ण झाले आहेत. आज या चित्रपटाने बॉलीवुडमधील जवळपास सर्व मोठ्या चित्रपटांच्या आजीवन कमाईला मागे टाकलं आहे, फक्त शाहरुख खानचा …

Read More »

शुक्लांनी सांगितली ‘किक’ची आठवण

जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांची बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच बर्‍याच चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे. ‘किक’मध्ये सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होते. जॅकलिनच्या वडिलांची भूमिका सौरभ शुल्का …

Read More »

माणसं रंग दाखवतात

‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. हे कलाकार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याने पोस्ट केलेले फोटो अथवा कॅप्शन हे चर्चेचा विषय बनतात. आता अभिनेत्याच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होळीच्या निमित्ताने कुशलने …

Read More »

मालिकाविश्वाला रामराम

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत …

Read More »

चर्चा गोविंदाच्या घटस्फोटाची

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणार्‍या सततच्या मतभेदांमुळे हा …

Read More »

आता ‘किक’चाही सिक्वेल

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत ’सिकंदर’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटानंतर सलमान कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘किक 2’ हा आहे. …

Read More »

तूच माझा फेवरेट…

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ’फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेमंतचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपटांमध्ये …

Read More »