लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर यांना नुकतीच 86 वर्षेपूर्ण झाली. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ’ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला. ’अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि …

Read More »

विचित्र वास्तव

णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अ‍ॅडम ब्रिटन …

Read More »

मातीतल्या सोन्याची कमाई

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोने काढले जाते. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं. …

Read More »

गौतम भंगीरची यशोगाथा

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणार्‍या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड करण्यात आल्याने आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला निश्चितच वेगळी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांची कारकीर्द निश्चितच महत्त्वाची होती. 2007 ची पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा असो किंवा त्यानंतर 2011 मध्ये भारताने जिंकलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असो या दोन्ही स्पर्धेमध्ये 11 खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचे …

Read More »

निर्जीवाचा जीव

हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्‍या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्‍या …

Read More »

कांदा कधीपासून खाल्ला जातो?

जगभरातील लोकांच्या आहारात कांदा असतोच. गरिबांसाठीही कांदा- भाकर हे सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. कांद्याचा वापर मेसोपोटेमियात म्हणजे सध्याच्या इराक-इराणच्या परिसरात 4000 वर्षांपूर्वी केला जात असे, हे एका लेखातून स्पष्ट झाले आहे. 1985 साली एका फ्रेंच पुरातत्त्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. जगभरातल्या एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला …

Read More »

कहाणी एका स्वप्नपूर्तीची

राजस्थानमध्ये गौना परंपरेनंतरच लहान वयात लग्न झालेली वधू सासरी संसार थाटण्यासाठी जाते. ही त्या जोडप्यांसाठी आयुष्याची नवी सुरुवात असली, तरीही मुलींच्या मनात असणार्‍या स्वप्नांचा शेवट असतो. मात्र, रुपा यादवच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी होती. रुपाने तिच्या कुटुंबीयांच्या, खास करून तिच्या मेव्हण्याच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण केले. घरच्यांचा पाठिंबा असला तरीही रुपाला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. आर्थिक …

Read More »

अज्ञानाचे बळी

निसर्गावर विजय वगैरे मिळवणं आपल्याला कधीच शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते; पण कथित आर्थिक विकासाच्या कैफात आपल्याला तसं पदोपदी वाटू लागलंय, हे मात्र खरं. निसर्ग हा सातत्यानं आपल्याला काही ना काही देत राहतो आणि आपण सातत्यानं त्याला ओरबाडत राहतो. त्यामुळं एकीकडे पैसा फुगत चाललाय आणि दुसरीकडे निसर्ग जखमी होत चाललाय. खिसे फुगल्यामुळं पर्यटनाचा पूर आलाय; पण पर्यटन कशाला म्हणायचं, …

Read More »

डोळ्यांच्या स्कॅनिंगमधून किडनीचा अंदाज

डिनबर्ग विद्यापीठातर्फे घेतल्या गेलेल्या एका अभ्यासात ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी ओटीसी तंत्राच्या माध्यमातून डोळ्यांच्या थ्रीडी फोटोच्या मदतीने विविध आजारांचे निदान केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने एका नव्या क्रांतीची ही सुरुवात मानली जाते. अनेक आजारांचे निदान अतिशय उशिरा होते. त्याचा बीमोड करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरू शकेल, असा अभ्यासकांचा होरा आहे. एडिनबर्गच्या संशोधकांनी 204 किडनी रुग्णांवर अभ्यास करत त्यातून हा निष्कर्ष …

Read More »

श्रमसातत्य महत्वाच्ं

प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात. सगळेच ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात असेही नाही. पण म्हणून त्यांचे प्रयत्न कधीच थांबत नाही. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण स्वतःचे व्यवसाय सुरु करुन त्यांच्या मोठ्या स्वप्नांची बीजे रोवत आहेत. व्यवसाय सुरु करणे एवढे सोपे नाही. हा रस्ता प्रचंड संयम पाहणारा आणि कष्टदायक …

Read More »