लेख-समिक्षण

रविवार विशेष

दाढीपुराण

दाढी ही निसर्गाने पुरुषाला दिलेली अशी भेट आहे, जी काहीजणांना हवीशी वाटते तर काहींना नकोशी. गंमत म्हणजे, दाढी आणि मिशी फक्त पुरुषांना लाभलेली असली, तरी मराठीत हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. दाढीचा संबंध कधी धर्माशी जोडला जातो, कधी परंपरेशी तर कधी चेहर्‍याच्या उठावदारपणाशी. प्राचीन ऋषीमुनींच्या दाढीपासून आजच्या कॉर्पोरेट दाढीपर्यंत एक मोठी परंपरा पाहायला मिळते. अलीकडे दाढी वाढवण्याचा आणि तिला वेगवेगळे …

Read More »

अगम्य लीला

दसर्‍यानिमित्त रावणदहन झोकात झालं. उत्तर भारतात हा कार्यक्रम फार मोठा असतो. आपल्या राज्यात यंदा निवडणुकीच्या आधीचा दसरा असल्यामुळं रावणदहनापेक्षा जास्त लक्ष मेळाव्यांवर केंद्रित झालं होतं. त्यामुळं विरोधकांवर फेकलेले शाब्दिक बाण यंदा अधिक टोकदार झाले होते. असो, तर रावणदहन हा सोहळा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. उत्तरेत सामान्यतः शारदीय नवरात्राला प्रारंभ झाल्यापासून रामलीलेचं मंचन सुरू होतं आणि विजयादशमीला रावणदहनाने त्याची …

Read More »

विचित्र ‘केस’

दहा ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा एक विशेष दिवस आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो ज्यांच्यासाठी साजरा केला जातो त्यातील बहुसंख्यांना त्याची कल्पनाच नसते आणि तो साजरा करणं आपल्यासाठीही आवश्यक आहे, याची कल्पना इतररांना नसते. 1992 पासून साजरा केला जाणारा हा दिवस म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन. शरीराप्रमाणं मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आजारी पडू शकतो, याची आपल्याला …

Read More »

पुन्हा हाथरस!

शाळेत शिक्षण मिळतं. शिक्षणामुळं अज्ञानाचा अंधकार दूर होतो. सत्य दिसू लागतं आणि त्यामुळं मनातल्या वेडगळ, जुनाट अंधश्रद्धा दूर होतात. अमानवी रूढी संपुष्टात येतात, असा सर्वसाधारण प्रवास आहे. पण शाळा काढणार्‍याच्याच डोक्यातून वेडगळ समजुती जात नसतील, तर काय घडतं? हाथरस… पुन्हा एकदा हाथरस! 14 सप्टेंबर 2020 रोजी घडलेलं सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, काही महिन्यांपूर्वी भोलेबाबाच्या सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 लोकांचा …

Read More »

गर्दी कशासाठी?

तुमच्या जवळपास आज उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन किंवा तत्सम एखादा कार्यक्रम आहे का? माहिती घेऊन सांगा. महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक लोकांचं उत्तर होकारार्थी येईल. साहजिक आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मग असे कार्यक्रम करताच येणार नाहीत. तत्पूर्वी किमान कुदळ मारून घ्यावी, हा सुज्ञ विचार करून सर्वपक्षीय स्थानिक राजकारणी सध्या मतदारसंघाच्या दौर्‍यात व्यस्त आहेत. (आणि राज्यस्तरीय नेते यात्रांमध्ये!) नंतर कुदळ मारलेल्या जागी …

Read More »

संकट येणार?

‘गॉड ऑफ केऑस’ शब्द ऐकल्यावर त्यातल्या त्यात बरं वाटलं. ‘केऑस’ या शब्दाला मराठीत अनागोंदी, अंदाधुंदी, सावळा गोंधळ, बजबजबुरी असे अनेक प्रतिशब्द आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असं वातावरण. अशा स्थितीचं प्रतिनिधित्व करणारी एक देवता इजिप्शियन संस्कृतीत आहे आणि ग्रीक भाषेत तिला ‘अपेप’ किंवा ‘अपेपी’ म्हणतात, ही माहिती सध्या मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रमुख राजकीय …

Read More »

देर है…

भ्रष्टाचार हा शब्द कुणी उच्चारला तर हसू येईल की काय, अशी भीती वाटू लागलीय. मुळात तो कुणी उच्चारल्यास त्यातल्या त्यात खरा वाटेल, हा प्रश्न पडतो. आपण स्वतः सोडून कुणाचीही याविषयी बोलायची लायकी नाही, असंच प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाचे पाय मातीचे. हजारो कोटींचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर येऊन टीआरपी खाऊन गेले. पुराव्यांच्या राशीच्या राशी डोळ्यांसमोर दिसता-दिसता नजरेआड झाल्या. कुणी ट्रकमधून, कुणी बैलगाड्यांमधून …

Read More »

डिजिटल स्वप्नव्यत्यय

झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …

Read More »

डिजिटल स्वप्नव्यत्यय

झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …

Read More »

नवविस्थापित

री करणारे ती एक कला मानतात आणि बर्‍याच प्रमाणात ती असतेही! कडेकोट बंदोबस्तात जपून ठेवलेला ऐवज हातोहात लांबवणं सोपं नसतं. पण बर्‍याच वेळा काय चोरावं, हे चोरांना कळत नाही आणि हाताला लागतील त्या वस्तू ते पळवून नेतात. त्यामुळं कधी-कधी चोरीला गेलेल्या ऐवजाच्या यादीत पैसाअडका, सोनंनाणं याबरोबरच अशा काही वस्तू दिसतात, ज्यांचा चोरांना काही उपयोग नसतो आणि त्या विकताही येत नाहीत. …

Read More »