लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

यशाची नवी ‘दृष्टी’

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवल्या आहेत. श्रीकांत बोला हे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1992 रोजी आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मापासून अंध आहेत. मुलगा झाल्यावर प्रत्येकाच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. पण, अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्याने घरात निराशा पसरली होती. …

Read More »

कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची

प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भावंडे अशी भरपूर मंडळी होती. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी चेन्नईत 250 रुपयांची नोकरी पत्करली आणि मिळालेली रक्कम घरी पाठवत राहिले.एक दिवस एका परिचिताने प्रेम यांना मुंबईत येऊन …

Read More »

चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप

उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अ‍ॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …

Read More »

अपार संघर्षातून यशाची कहाणी

पेट्रीसिया नारायण यांची जीवनकथा संघर्ष, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीचे प्रतीक आहे. तामिळनाडूमधील नागरकोइल येथे ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या पेट्रीसियांनी, वयाच्या 17व्या वर्षी नारायण नावाच्या हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला. परंतु, हा निर्णय त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने घेऊन आला. नवरा व्यसनाधीन आणि अत्याचारी असल्यामुळे, त्यांनी एका वर्षानंतर दोन मुलांसह त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांना परत स्वीकारले, परंतु पेट्रीसियांना स्वतःच्या पायावर उभे …

Read More »

संघर्षातून उभारला बॅँ्रड

मॅडम सी. जे. वॉकर यांचे खरे नाव सारा ब्रेडलव्ह होते. त्या अमेरिकेतील पहिल्या सेल्फ मेड महिला कोट्यधीश ठरल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आणि केवळ आर्थिक यशच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनातही मोठा वाटा उचलला. सारा यांचा जन्म 23 डिसेंबर 1867 रोजी लुईझियाना, अमेरिका येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील गुलामगिरीतून मुक्त झालेले होते. लहान वयातच आई-वडिलांचे निधन …

Read More »

यशोगाथा वाडीलाल आइसक्रीमची

उन्हाळा सुरू झाला की आइसक्रीमचा आनंद लुटणार्‍यांची संख्या वाढते. आज बाजारात अनेक मोठे आइसक्रीम ब्रँड्स आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे वाडीलाल आइसक्रीम. पण हा ब्रँड एका मोठ्या कंपनीसारखा सहज स्थापित झालेला नाही, तर यामागे आहे संघर्ष, मेहनत आणि सातत्याने प्रयत्नांची कहाणी. वाडीलाल गांधी हे या आइसक्रीमचे जनक. त्यांचा प्रवास मात्र एका अत्यंत लहान व्यवसायापासून सुरू झाला. गुजरातमध्ये 1907 मध्ये …

Read More »

कल्पनातीत संघर्षातून भरारी

कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा …

Read More »

संघर्षातून बनवला लक्झरी ब्रँड

इटलीच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेले गुच्चिओ गुच्ची हा नावारूपाला येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. गुच्चिओचा यांचे वडील हॅटमेकर होते, पण घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. लहानपणापासूनच त्यांना मोठं काहीतरी करायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अनेकदा संधी मिळत नव्हत्या. तरुणपणी त्यांनी लंडन आणि पॅरिसमध्ये छोटे-मोठे काम केले. एका हॉटेलमध्ये ते साध्या नोकरासारखे काम करत होते. पण हे काम करत असताना …

Read More »

ओरॅकल काराची यशोकहाणी

ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर वडील सोडून गेले आणि आईला एकटीला त्यांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने नऊ महिन्यांचे असताना त्यांना त्यांच्या मावशीने आणि मामा- मामांनी दत्तक घेतले. पण त्यांचे दत्तक वडील कठोर स्वभावाचे होते आणि अनेकदा त्यांना टोचून बोलत. तू आयुष्यात काहीच …

Read More »

महान वैज्ञानिकाची प्रेरक यशोगाथा

मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्‍या फेराडे यांनी पुस्तके वाचून …

Read More »