पांचजन्य डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या वृत्तपत्राचे खासगीपण जपण्याचे धोरण हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही. जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ९८ किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.