‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम लिला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गंगुबाई’सारखे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपट ५० टक्के पूर्ण झाला आहे. १०० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ९० दिवसांचे शिल्लक आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. आठ महिने सलग चित्रीकरण सुरु होते. ऑगस्टपासून रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यातल्या सामन्याचे चित्रीकरण सुरु होईल. आतापर्यंत कागदावर असलेल्या या दृश्यांचे चित्रीकरण काटेकोर व्हावे यासाठीची सर्व काळजी घेण्यात आली आहे. हा चित्रपटाचा महत्वाचा भाग ठरणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा बराचसा भाग मुंबईत चित्रीत झाला असला तरी महत्त्वाचा भाग रोममध्ये चित्रीत करण्याचा भन्साळींचा मानस आहे. ऑटोबरमध्ये हे चित्रीकरण सुरु होण्याची शयता आहे. त्यावेळी आलिया भटवरील दृश्यांचे चित्रीकरण होणार आहे. मार्च २०२५ मध्ये प्रदर्शित होणाजया या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. आतापर्यंत झालेल्या चित्रीकरणाचे एडिटींग भन्साळींनी पूर्ण केले आहे. रणबीर आणि विकी यांना मिळालेल्या जबरदस्त दृश्यांप्रमाणेच आलियाला जोरदार दृश्ये देण्यात आली आहेत. – किर्ती कदम
Check Also
किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर …