प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, नायकाच्या डोळ्यांत एक अनामिक शोध, आणि त्याच वेळी समोरून येणारी ती! पडद्यावर क्षणभर थांबलेला श्वास, थरार आणि कोमलतेचा संगम. ही आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ची प्रेमकथा जी जणू काळाला वळसा घालून आली आहे. हिंसा, डार्क कंटेंट आणि ओटीटीच्या जगात हरवलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाशी जोडणारी ही जादू आहे.
गेल्या काही वर्षांत सिनेमागृहातील अनुभव वेगळाच झाला होता. बंदुकीच्या आवाजांनी, रॉ मॅस्युलिनिटीच्या घोषणांनी, आणि वेब सीरिजच्या धुंदीत, पडद्यावरील प्रेम जणू लाजरं झालं होतं. प्रेक्षकांचं लक्ष जास्तीत जास्त क्राईम थ्रिलर, बायोपिक आणि अॅशन ड्रामांकडे होतं. पण कुठेतरी हृदयाच्या कोपर्यात अजूनही तोच जुना रोमँटिक प्रेक्षक श्वास घेत होता, जो ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ किंवा ‘कुछ कुछ होता है’ पाहताना स्वतःच्या प्रेमकथांची स्वप्नं पाहायचा. ‘सैयारा’ने त्याच भावना पुन्हा जाग्या केल्या.
प्रेक्षकांचं हृदय जिंकण्यासाठी मोठा स्टारडम लागतो का? नेहमीच नाही. कधी कधी हृदयाला भिडणारे दोन साधे चेहरे पुरेसे असतात. ‘सैयारा’चा नायक अहान पांडे हा पडद्यावर थोडासा गोंधळलेला, पण हळूहळू हसणारा मुलगा आणि नायिका अनीता पड्डाच्या डोळ्यांत पहिल्या पावसासारखी निरागसता. दोघांची केमिस्ट्री इतकी साधी, वास्तववादी की प्रेक्षकाला वाटतं अरे हे तर आपल्यासारखंच आहे! हीच बाब जुन्या रोमँटिक चित्रपटात दिसून यायची. कथानकात काही फार नवं नसूनही भावनांची प्रामाणिकता इतकी असायची की प्रेक्षक आपोआप त्या प्रेमकथेत स्वतःला शोधायचा.
बॉलिवूड आणि रोमँस यांचा एकमेकांशी असलेला संबंध हा अगदी सुरुवातीपासूनच घट्ट राहिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने ज्या प्रकारे प्रेमकथांचा सोनेरी इतिहास घडवला आहे, तसा अनुभव जगातील फार थोड्या चित्रपटसृष्टींनी दिला आहे. राज कपूर आणि नरगिस यांचा *आवारा*पासून ते शाहरुख खान आणि काजोल यांच्या *दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे*पर्यंत, भारतीय प्रेक्षकांच्या मनात भावनांच्या गाठी बांधणारा हा प्रवास सलग चालू राहिला.मात्र २०१० नंतरच्या दशकात बॉलिवूडमध्ये एक वेगळेच चित्र दिसू लागले. ग्लोबलायझेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा उदय, प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी, आणि दक्षिणेकडील भव्य अॅशनपटांच्या यशामुळे पारंपरिक प्रेमकथा हळूहळू दुय्यम ठरल्या. तमाशा, कपूर अँड सन्स यांसारख्या चित्रपटांनी भावनिक कथानक मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या पडद्यावर गोड रोमँटिक स्वप्न दाखवण्याची परंपरा जवळजवळ हरवली होती.
कोविडनंतरची अवस्था तर अधिक कठीण होती. प्रेक्षकांचे थिएटरकडे जाणे कमी झाले, आणि जे जात होते, त्यांना मोठ्या कॅनव्हासवरील स्पेटॅयुलर अनुभव हवे होते. परिणामी, अॅशन, ऐतिहासिक ड्रामा, किंवा सिक्वेल्स, रिमेस यांचा पाऊस पडला. हिंदी चित्रपटसृष्टीतले मूळ भावनिक ‘लव्ह स्टोरीज’ मात्र कोपर्यात ढकलल्या गेल्या.
याच पार्श्वभूमीवर आलेल्या सय्याराने एक वेगळा प्रवास सुरू केला. साधी, भावनिक, आणि संगीतमय प्रेमकथा मांडणार्या या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा त्या हरवलेल्या जादूची आठवण करून दिली. इंस्टाग्राम रील्सवर भावनांनी भारलेले चेहरे, पहिल्या प्रेमाच्या थराराने भरलेले व्हिडिओ, आणि थिएटरबाहेर पडताना काढलेले ‘रोनी सेल्फीज’ — हे दृश्य जणू जुन्या काळातील बॉलिवूड रोमँसची कमतरता पूर्ण करत होते.
सय्यारा या चित्रपटाचे सर्वात मोठे यश म्हणजे त्याची प्रामाणिकता. यातले प्रेम हे केवळ फास्ट-फॉरवर्ड कथानकाचे उपउत्पादन नाही, तर दोन व्यक्तींमधील हळूहळू तयार होणार्या नात्याचा प्रवास आहे. हाच तो भाग आहे, जो आजच्या पिढीला सोशल मीडियावर दिसतो, पण खर्या आयुष्यात कमी जाणवतो. चित्रपटाने त्या रिकाम्या जागेला स्पर्श केला, आणि म्हणूनच प्रेक्षक थिएटरपर्यंत आले.
बॉलिवूडच्या यशस्वी प्रेमकथांचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे संगीत. दिलीपकुमारच्या काळातील शास्त्रीय रागांवर आधारलेली गाणी असोत, की किशोरकुमार-लता मंगेशकर यांच्या काळातील सदाबहार धून, किंवा ए.आर. रहमानच्या आधुनिक रोमँटिक मेलडीज — प्रेमकथांना यश देणारे हे संगीत प्रेक्षकांच्या भावनांशी थेट संवाद साधते. सय्यारानेही हाच मंत्र वापरला. त्याच्या संपूर्ण अल्बमने सोशल मीडियावर आणि रेडिओवर एकाचवेळी लोकप्रियता मिळवली, ज्यामुळे चित्रपटाची जाहिरात नैसर्गिकपणे झाली. दिग्दर्शक राजीव भटनागर यांनी एका मुलाखतीत सांगितले, मी फक्त अशी कथा सांगू इच्छित होतो जी साधी आहे पण मनाला भिडते. आम्ही जबरदस्तीचे गाणे, आयटम सॉन्ग किंवा अॅशन टाकण्याचा मोह टाळला. प्रेक्षकांना आज शांत, हळवी कथा हवी होती आणि त्यांनी ‘सैयारा’ला आपलंसं केलं.
दुसरा महत्वाचा घटक म्हणजे स्मार्ट मार्केटिंग. पारंपरिक मल्टिप्लेस इव्हेंट्स किंवा भव्य प्रेस टूर न करता, चित्रपटाने डिजिटल प्रमोशनवर भर दिला. इंस्टाग्रामवर मायक्रो-इन्फ्लुएन्सर्स, युट्यूब शॉर्ट्स, टिकटॉकवर भावनिक रील्स या सगळ्यांनी मिळून जणू ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ निर्माण केला. अगदी काव्या यादवसारख्या सिनेमाप्रेमींना देखील वाटले की, जर हा चित्रपट पाहिला नाही तर मी जनरेशन-झेडपासून मागे राहीन!
यामुळे एक मोठा धडा मिळतो. आजच्या डिजिटल युगात भावनिक कनेशनच सर्वात मोठा मार्केटिंग टूल आहे.
परंतु, रोमँटिक चित्रपटांचे यश मिळवण्यासाठी केवळ मार्केटिंग आणि गाणी पुरेशी नसतात. चित्रपटातली हृदयस्पर्शी गोष्ट ही खरी जादू आहे. प्रेक्षक अजूनही प्रेम, विरह, आणि छोट्या-छोट्या भावनिक क्षणांमध्ये गुंतू इच्छितात. त्यांना अजूनही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या मोहरीच्या शेतातील हात पसरलेला शाहरुख आठवतो. आज जर बॉलिवूडने हाच धागा धरून सतत दर्जेदार प्रेमकथा आणल्या, तर येणारे दोन-तीन वर्षे‘रोमँसचा नवा हंगाम’ ठरू शकतात. अखेर, सिनेमाचे यश केवळ दृश्य वैभवात नसते; ते प्रेक्षकांच्या हृदयात रुजलेल्या भावनांत असते. सय्यारा ही त्याचीच ताजी आठवण आहे. आणि कदाचित, याच प्रेमाच्या जादूमुळे बॉलिवूड पुन्हा एकदा आपल्या जुन्या तेजाने उजळू शकते.
आजच्या ओटीटी आणि अॅशनप्रधान सिनेमाच्या वातावरणात, एका सरळसोट पण हृदयस्पर्शी प्रेमकथेने एवढा मोठा बॉस ऑफिस गाजावाजा करावा, ही गोष्टच निर्मात्यांसाठी मोठा संकेत आहे. अहान पांडे आणि अनीता पड्डा यांची ताजी जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. थिएटरमध्ये त्यांच्या प्रवेशावर टाळ्यांचा आवाज आणि लायमॅसमध्ये उमटलेले हुंदकेहे सारे ‘सैयारा’ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. ‘बॉबी’, ‘लव्ह स्टोरी’, ‘आशिकी’ ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या चित्रपटांनी त्या-त्या पिढीवर अधिराज्य गाजवले. कदाचित ‘सैयारा’ही आजच्या पिढीवर राज्य करणारी प्रेमकथा ठरू शकते.
काव्या यादव, वय ३१, एका म्युझिक मार्केटिंग एजन्सीची मालक आणि बॉलिवूडची चाहती, हिंदी चित्रपटांबाबत जवळपास निराश झाली होती. हॉलीवूडचे समर रिलीज तिचे मनोरंजन करत होते; पण बॉलिवूडमधून काहीही थिएटरमध्ये जाऊन पाहण्याजोगे वाटत नव्हते. हे चित्र अचानक बदलले, जेव्हा ़‘सय्यारा’़ने तिच्या इन्स्टाग्राम फीडवर कब्जा केला. “त्या रील्स पाहून मला प्रचंड ‘एफओएमओ’ येतोय! चित्रपट पाहिल्यावर पश्चाताप झाला तरी चालेल, पण तरीही मी जाईन; कारण मला जनरेशन-झेडपासून तुटल्यासारखे वाटू नये,” ती हसत सांगते. अलीकडे तुम्ही ऑनलाईन असाल, तर कदाचित तुम्ही हे दृश्यही पाहिले असेल की, “सय्यारा” पाहिल्यानंतरचे अश्रुपूर्ण सेल्फीज, नाट्यमय रिअॅशन्स, आणि अतिभावुक रील्सची लाट. विशेष म्हणजे या रील्समधील बहुतेक चेहरे हे जनरेशन-झेडचे असून, जणू प्रेम आणि हृदयभंग पहिल्यांदाच अनुभवत असल्यासारखी त्यांची अभिनयशैली आहे. हे व्हिडिओज काहींना ‘क्रिंज’ तर काहींना ‘यूट’ वाटू शकतात, पण यामागे प्रभावी मार्केटिंग आणि इन्फ्लुएंसर स्ट्रॅटेजी असल्याचे स्पष्ट होते. मात्र, गाजावाजा खरा आहे आणि चित्रपटाचे यशही. ‘सय्यारा’ने सुमारे ८८ दशलक्ष दिरहॅम (सुमारे २ अब्ज रुपये) कमाई केली होती. या बॉस ऑफिस विक्रमांपलीकडेही ‘सय्यारा’ने एक अनपेक्षित गोष्ट साध्य केली ती म्हणजे बॉलिवूडमधील एकेकाळी अधिराज्य गाजवणारा पण अलिकडे धापा टाकणारा रोमँटिक चित्रपटांचा प्रकार पुन्हा जिवंत केला.- सोनम परब
Check Also
किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर …