लेख-समिक्षण

‘व्हॉटसअ‍ॅप’काराची यशोगाथा

जगातल्या संवादाच्या साधनांचा प्रवास जितका उत्कंठावर्धक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही आहे. आज आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, कुठेही असलो तरी आपल्या प्रियजनांशी क्षणोक्षणी संवाद साधू शकतो, आणि हे शय झाले आहे स्मार्टफोन व मेसेजिंग अ‍ॅप्समुळे. या क्रांतीत जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा सिंहाचा वाटा आहे. पण या अ‍ॅपमागची प्रेरणादायी कहाणी जितकी विलक्षण आहे, तितकीच भावस्पर्शीही आहे. ही कहाणी आहे जॅन कौम या युक्रेनियन-अमेरिकन उद्योजकाची. एका गरिब, संघर्षमय बालपणातून उभा राहून जगभरात संवादाची नवी व्याख्या करणारा हा तरुण आज जगभरातील असंख्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
मी एकच गोष्ट करणार आणि तीच उत्तम करणार
गरीबी, परकीय भूमीवरील संघर्ष, आईचे आजारपण, अपमानाचे क्षण — हे सगळे पार करत, एका साध्या मुलाने केवळ चिकाटी, परिश्रम आणि कल्पकतेच्या जोरावर जगभरात संवादाची क्रांती घडवली. हीच जॅन कौम यांच्या जीवनकथेची खरी प्रेरणा आहे.
जॅन कौम यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९७६ रोजी युक्रेनमधील कीव शहरात एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील बांधकाम क्षेत्रात मजूर होते, तर आई घरकाम करून कुटुंब चालवत असे. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्या काळी युक्रेनवर कम्युनिस्ट राजवट होती, त्यामुळे खाजगीपणा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांची फारशी कल्पनाच नव्हती. पूर्व युरोपातील राजकीय घडामोडींनंतर कौम कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १६व्या वर्षी जॅन आपल्या आईसोबत कॅलिफोर्नियाला आले. अमेरिकेत सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. एका समाजकल्याण कार्यक्रमाच्या मदतीने त्यांना दोन बेडरूमचे छोटेसे घर मिळाले.
वडील अमेरिकेत येऊ शकले नाहीत, आणि थोड्याच काळात आईला कॅन्सर झाला. जॅनने किराणा दुकानात साफसफाई कामगार म्हणून काम सुरू केले, तर आईने बेबीसिटर म्हणून काम केले. सरकारी मदतीवर घर चालत होते. दीर्घ आजारपणानंतर २००० साली आईचे निधन झाले. संघर्षाच्या या काळात जॅन कौम यांनी मनाशी एकच निश्चय केला — शिक्षण घेऊन आणि कौशल्य मिळवून आपले नशीब बदलायचे.
कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये रस असलेल्या जॅनने वयाच्या १८व्या वर्षीच या क्षेत्रात काम सुरू केले. सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी ‘अर्न्स्ट अँड यंग’ या कंपनीत सियुरिटी टेस्टर म्हणून नोकरी केली. याच काळात त्यांनी ‘ु००ु००’ नावाच्या संगणक सुरक्षा गटात सहभाग घेतला आणि आपले कौशल्य वाढवले.
इथंच त्यांची भेट झाली ब्रायन अ‍ॅटन यांच्याशी — पुढे व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक होणार्‍या मित्राशी. ही मैत्री आयुष्य बदलणारी ठरली. जॅनला याहू कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ काम सुरू केले. जवळपास दहा वर्षेत्यांनी याहूमध्ये काम केले, पण मनाच्या कोपर्‍यात स्वतःचे काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न होतंच.
२००९ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरले. त्या काळात स्मार्टफोन क्रांती सुरू झाली होती. जॅन कौमने पाहिले की लोक स्काइप, शाझामसारखी अ‍ॅप्स वापरत आहेत, पण आप्तेष्टांशी सहज आणि स्वस्तात संवाद साधण्याची सोपी पद्धत उपलब्ध नाही. म्हणूनच त्याने मित्र अ‍ॅलेस फिशमनकडे आपली कल्पना मांडली — एक असे अ‍ॅप तयार करायचे जे कुटुंबीयांना व मित्रांना एकत्र ठेवेल, जे फोन कॉल आणि मेसेजिंग दोन्ही सुलभ करेल.
आपल्या ३३व्या वाढदिवशी, २००९ मध्ये, जॅन कौमने कॅलिफोर्नियात ‘व्हॉट्सअ‍ॅप इन्क’ची नोंदणी केली. सुरुवातीला या अ‍ॅपकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, पण अ‍ॅपलने पुश नोटिफिकेशनची सुविधा दिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. जुन्या एसएमएसला मागे टाकत लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपला भरभरून प्रतिसाद दिला. ब्रायन अ‍ॅटनने ड़२,५०,००० इतके बीजभांडवल उभे केले आणि दोघांनी या स्वप्नाला उंच भरारी दिली.
२०१४ मध्ये त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आले. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जॅनला जेवणासाठी बोलावले आणि फेसबुक बोर्डमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. थोड्याच काळात फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप तब्बल १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतले. नंतर काही वादांमुळे जॅन आणि ब्रायनने फेसबुक सोडले, तरीही ‘रेस्ट अँड व्हेस्ट’ या पद्धतीमुळे जॅनला मोठा आर्थिक लाभ झाला.
जॅन कौमच्या आयुष्यातील संघर्ष जितका प्रेरणादायी आहे, तितकीच त्यांची नम्रता आणि परोपकाराची वृत्तीही उल्लेखनीय आहे. त्यांनी ‘कौम फॅमिली फाऊंडेशन’मार्फत १.१५ अब्ज डॉलर्सहून अधिक दान केले आहे. तसेच, फ्रीबीएसडी फाऊंडेशनला एक दशलक्ष डॉलर्स देणगी दिली आणि ज्यू व इस्रायलशी संबंधित अनेक कारणांना हातभार लावला. आज जॅन कौमकडे ९७० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे, पण ते कधीही स्वतःला मोठा उद्योजक म्हणवून घेण्याची हौस ठेवत नाहीत. त्यांचे एक वाय जगभरातील तरुणांना आजही प्रेरणा देते.

Check Also

नैराश्याने मेंदूचे आकुंचन

निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने …