कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. हवा आणि नद्या शुद्ध झाल्याची अनेक उदाहरणे त्यानंतरच्या काळात समोर आली होती. मात्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. आता संशोधकांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते! लॉकडाऊन काळात पृथ्वीवरील तापमानात आणि प्रदूषणात घट नोंदवली गेली होती.
आता त्याचा प्रभाव हा चंद्रापर्यंत झाल्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पीअर-रिव्ह्यूडमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, कोव्हिडच्या काळात एप्रिल-मे २०२० च्या कडक लॉकडाऊनच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट दिसून आली आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे (पीआरएल) के दुर्गा प्रसाद आणि जी अम्बिली यांनी २०१७ आणि २०२३ दरम्यान सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले आहे. यासंदर्भातील माहिती देताना पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने अतिशय महत्त्वाचं काम केले आहे. हे एक वेगळे संशोधन आहे. संशोधनात असे आढळून आले की, इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या वर्षातील तापमान सामान्यपेक्षा ८ ते १० केल्विनने कमी असल्याचे आढळून आले आहे.
Check Also
ऋणातून उतराई…
ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये …