आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
मुलांना इंटरनेट वापरताना विविध प्रकारच्या सायबर धोयांचा सामना करावा लागू शकतो.
सायबर बुलिंग (सायबर छळ): ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मुलांना त्रास देणे, धमकावणे किंवा अपमानित करणे.
फिशिंग आणि स्कॅम्स: खोट्या वेबसाइट्स किंवा ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती चोरण्याचे प्रयत्न.
अनुचित सामग्रीचा प्रवेश: वयाच्या दृष्टीने हानिकारक सामग्री पाहण्याची शयता.
ऑनलाइन प्रिडेटर्स: इंटरनेटद्वारे मुलांशी मैत्री करून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती.
सुरक्षित पासवर्ड: मुलांना मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड वापरण्यास प्रोत्साहित करा.
योग्य शिक्षण, जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आपण मुलांना सुरक्षित डिजिटल वातावरण प्रदान करू शकतो. त्यामुळे, पालकांनी सतर्क राहून आणि सक्रियपणे सहभाग घेऊन मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहावे.
उपाय काय आहेत?
शिक्षण आणि जागरूकता: मुलांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल शिक्षित करा. त्यांना सायबर धोयांची माहिती द्या आणि त्यांच्याशी खुलेपणाने संवाद साधा.
पालकांचे नियंत्रण (पॅरेंटल कंट्रोल्स): डिव्हाइसेस आणि अॅप्सवर पालकांचे नियंत्रण सेटिंग्ज वापरा. यामुळे अनुचित सामग्रीचा प्रवेश रोखता येतो.
गोपनीयता सेटिंग्ज: सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गोपनीयता सेटिंग्ज योग्य प्रकारे सेट करा.
वेळमर्यादा: इंटरनेट वापरासाठी वेळेच्या मर्यादा ठेवा. यामुळे मुलांचे ऑनलाइन वेळ नियंत्रित करता येते.
विश्वासपूर्ण संबंध: मुलांशी विश्वासपूर्ण संबंध ठेवा. यामुळे ते कोणत्याही ऑनलाइन समस्येबद्दल तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतील.
सॉफ्टवेअर अपडेट्स : डिव्हाइसेस आणि अॅप्स नियमितपणे अपडेट करा. यामुळे सायबर सुरक्षेतील उणिवा दूर होतात.
सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा: सार्वजनिक वायफाय नेटवर्सवर संवेदनशील माहिती शेअर करण्यापासून मुलांना रोखा.
Check Also
परफेक्ट आयलिड मेकअपसाठी
डोळे हा चेहर्याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित …