स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे.
’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित न करण्याचे जाहिर केले. त्याने युट्युबचा पर्याय निवडला. पैसे द्या आणि चित्रपट पहा असा हा मामला आहे. परंतु अॅपल फोनच्या वापरकर्त्यांना हा चित्रपट नीटसा पहाता आला नाही. यासाठी त्यांनी १७९ रुपये मोजले होते. आमिर खानच्या निर्मिती संस्थेने याबाबत एक्स या माध्यमावर दिलगिरी व्यक्त केली. – किर्ती कदम
Check Also
किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर …