प्रत्येक प्राण्याचे किंवा प्रजातीचे आयुर्मान वेगवेगळे असते. ते तसे का असते याबाबत संशोधकांना कुतूहल वाटत होते. याचे कोडे डार्विनच्या काळापासून उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञांना सापडलेले नाही, पण आता एका नव्या प्रारूपानुसार कुठल्याही सजीवाच्या प्रजातीचे आयुर्मान हे उत्क्रांतीतील बदलांशी व त्यातून निर्माण होणार्या दडपणांशी संबंधित असते, असे आढळले आहे. या संशोधनाचा लाभ मानवातील वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी करणारी तंत्रे व औषधांचा शोध लावण्यासाठी होऊ शकतो. ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’ या नियतकालिकातील शोधनिबंधात नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेतील काही लोकप्रिय समजांना धक्का देण्यात आला आहे. न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्स सिस्टीम्स इन्स्टिट्यूट या संस्थेत यानीर वार्याम यांच्या नेतृत्वाखाली संशोधन झाले. त्यात शेकडो प्रारूपे तयार करून ती हार्वर्ड वेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या सहकायनि तपासण्यात आली. उत्क्रांतीमध्ये जर दबाव टाकणारे घटक जास्त तीव्र असतील व साधने कमी असतील तर आयुर्मान कमी होते. माणूस व इतर प्राण्यांचे आयुर्मान हे जनुकीय घटकांशीही संबंधित असते व त्यामुळे आपण वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतो, त्यामुळे सध्या वृद्धत्व रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हे चुकीच्या गृहितकांवर आधारित आहेत. बाह्य कारणाऐवजी सजीव जर वृद्धत्वाने मेलातर त्याला इंट्रिनिझिक मोरटॅलिटी म्हणतात. उत्परिवर्तन संकलन सिद्धांत प्रथम ऑक्सफर्डचे जैवशास्त्रज्ञ नोबेल विजेते पीटर मेदावर यांनी मांडला. त्यांच्या मते सजीव काही गोष्टी स्वीकारतात किंवा काही उत्परिवर्तने म्हणजे जनुकीय बदल होतात त्यामुळे आयुष्यात नंतरच्या काळात हानिकारक परिणाम होतात व तेच वृद्धत्वाची किंबहुना मृत्यूची लक्षणे दाखवतात. पे लॅटर थिअरीनुसार, परिणाम भोगा सिद्धांतात एक जनुक आयुष्याच्या सुरुवातीला फायद्याचा असतो, पण नंतर तो हानिकारक ठरतो. जो जनुक सुरुवातीला कर्करोगाला रोखतो तो नंतर क र्करोगास कारण ठरतो, याला अँटॅगोनिस्टिक प्लेइओट्रॉपी म्हणतात व ही कल्पना प्रथम मिशीगन विद्यापीठाचे जैवशास्त्रज्ञ जॉर्ज विल्यम्स यांनी १९५७ मध्ये मांडली होती. डस्र्विनच्या उत्क्रांतीबाबत नवीन दृष्टिकोन विल्यम्स व ब्रिटिश सांख्यिकीतज्ज्ञ सर रोनाल्ड फिशर यांनी मांडला. त्यांच्या मते जनुक हा उत्क्रांतीचा लहान घटक धरला तर त्यात अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. काही स्वार्थी जनुके दीर्घायुष्यासाठी मदत करतात. पण, त्यांचे निरीक्षण करता आलेले नाही.
Check Also
लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!
कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. …