राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन वापरले जाणार नाहीत, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. ओबीसी आरक्षण लॉटरी पद्धतीने काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित होतील, या चर्चेने जोर धरला होता. परंतु मनुष्य बळाच्या अभावी निवडणुका एकत्रित निवडणूक घेणे शय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी काळातील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघण्याची शयता आहे. राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळण्याची शयता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहे. तसेच या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. एखाद्या विधानसभा मतदारसंघात एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ती पद्धत अधिकाधिक वेळकाढू होते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. दरम्यान, निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारेच होणार आहेत. तसेच या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान होतील, अशीदेखील माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संसस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होण्याची शयता आहे. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढे मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, असे देखील संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अख्त्यारित ज्या निवडणुका होतात, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही. कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
’सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार काम केले जाते. ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे. मागील निवडणुकीतही ओबीसी आरक्षण होते. एससी एसटी आरक्षण हे ठरलेलं असतं. परंतु ओबीसी आरक्षण हे लॉटरी पद्धतीने काढले जाणार आहे, असे त्यांनी सांगितलं.
Check Also
भारत झुकेगा नही…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या …