लेख-समिक्षण

जगावेगळी कॉफी

चहाप्रमाणेच जगभरात कॉफीप्रेमींची कमतरता नाही. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या वाफाळलेल्या कपाने करतात. त्याचा सुगंध कॉफी पिणार्‍यांना वेड लावतो. एखाद्याला कॉफी पिण्याची सवय लागली तर तो त्याची वेगवेगळी चव ट्राय करतो. त्याच्या वेगवेगळ्या बीन्सची चव वेगवेगळी असते. जगातील सर्वात चविष्ट कॉफी इतकी महाग आहे की त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. या वेगवेगळ्या कॉफीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पण ती कशी बनवतात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटू शकते! परदेशातील काही कॉफी अशा आहेत ज्यांच्या बिया चक्क पशुपक्ष्यांच्या विष्ठेतून निवडलेल्या असतात. अशा कॉफींची ही माहिती…
लुवाक कॉफी : या कॉफीला सिवेट कॉफीही म्हटले जाते. सिवेट कॉफी ही एशियन पाम सिवेटच्या विष्ठेमधून गोळा केलेल्या बीन्सपासून बनवलेली एक खास कॉफी आहे, जी आपल्याला इंडोनेशियामध्ये मिळेल. सिवेट हे पिकलेली कॉफी चेरी खातात आणि मग या कॉफीच्या बिया त्यांच्या आतड्यांमध्ये एक अनोखी किण्वन प्रक्रिया पार पाडतात आणि नंतर एक-दोन दिवसांनी क्लस्टरमध्ये बाहेर येतात. मग काढणीनंतर हे प्रक्रिया केलेले बीन्स सर्वात महागडे कॉफी बीन्स म्हणून जगभरात विकले जातात.
ब्लॅक आयव्हरी कॉफी : ही सर्वात महागडी कॉफी बीन्स आहे जी हत्तीच्या विष्ठेपासून एकत्र केलेल्या बीन्सपासून बनविली जाते. इतरांप्रमाणेच त्याची प्रक्रियाही तशीच आहे. मात्र, हत्ती थेट झाडांवरील चेरी खाण्याऐवजी हाताने निवडलेले थाई अरेबिका चेरी हत्तींना खाण्यास दिले जातात. थायलंडमध्ये तुम्ही ही कॉफी खरेदी करू शकता.
जाकू बर्ड कॉफी : ब्राझीलमधील हे सर्वात मोठे कॉफी उत्पादन आहे. इथली खास कॉफी ब्राझिलियन पक्ष्यांच्या विष्ठेतून गोळा केली जाते. ब्राझीलमध्ये जाकू पक्षी पिकलेली कॉफी चेरी खातात आणि मग त्यांच्या विष्ठेतील बीन्स गोळा करून स्वच्छ करतात आणि मग भाजल्यानंतर खास कॉफी बीन्स तयार होतात व त्यांच्यापासून ही कॉफी बनते.

Check Also

ऋणातून उतराई…

ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये …