लेख-समिक्षण

गुलाबजलद्वारे सौंदर्य प्रसाधने

गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो.
गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याचे कसलेही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्टस् जाणवत नाहीत.
तुम्हाला केमिकलयुक्त महागडी उत्पादने घेण्याऐवजी स्वस्त आणि नैसर्गिक उपाय हवे असतील, तर घरीच गुलाब जल वापरून टोनर, फेसपॅक, आयपॅड बनवू शकता.
• फेस टोनर ः फेस टोनर त्वचेला हायड्रेट करून ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो.
• साहित्य: अर्धा कप गुलाब जल, १ चमचा अ‍ॅलोवेरा जेल, २-३ थेंब व्हिटॅमिन ई तेल. कृती : सर्व घटक एकत्र करून एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. हा टोनर दिवसभरात २-३ वेळा चेहर्‍यावर स्प्रे करू शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येईल .• फेस पॅक ः फेस पॅक त्वचेतील अशुद्धता काढून टाकतो आणि चेहरा उजळतो.
• साहित्य : २ चमचे मुलतानी माती, १ चमचा गुलाब जल, अर्धा चमचा मध
• कृती: सर्व साहित्य एकत्र करून एकसंध पेस्ट तयार करा आणि ती चेहर्‍यावर लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ बनेल.
• आय पॅड्स ः डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि थकवा दूर करण्यासाठी हे उपाय उपयुक्त आहे.
• साहित्य: २ कॉटन पॅड, गुलाब जल
• कृती : कॉटन पॅड गुलाब जलात भिजवून १०-१५ मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. हे थंडावा देऊन डोळ्यांची थकवा दूर करते आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत करते
.• मॉइश्चरायझर ः हे मॉइश्चरायझर त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते.
• साहित्य : २ चमचे गुलाब जल, १ चमचा ग्लिसरीन, १ चमचा खोबरेल तेल
• कृती : हे सर्व घटक चांगले मिसळून घ्या आणि दररोज चेहर्‍यावर लावा. त्वचा कोरडी पडत असल्यास, हे मॉइश्चरायझर चांगला परिणाम देईल.

Check Also

नैराश्याने मेंदूचे आकुंचन

निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने …