मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच मैत्री नव्हती त्याच्या वडिलांचा मी मित्र होतो. त्याचे वडिल शरद पिळगावकर हे निर्माते असल्याने त्यांच्या चित्रपटात मी काम केले. मायबाप सिनेमापासून आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. हा सिनेमा सचिनने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. त्यावेळी मी आणि सचिननं पहिल्यांदा एकत्र काम केलं. सचिनने तब्बल १५ मराठी सिनेमे बनवले. त्या सर्व पिचरमध्ये मी आहे.
अशोक सराफ सांगतात की, तेे कधी शरद पिळगावकरांना भेटायला गेले की तिथे सचिन पिळगावकर असायचे. काय कसाय? बरा आहे ना एवढचं आमचं बोलणं व्हायचं पण जेव्हा एकत्र काम करायला लागतो तेव्हा माझं आणि त्यांचं खूप जमलं. त्यामुळे आम्ही इतके चांगले मित्र बनलो की, विचारुच नका. आम्ही सलग सिनेमे केले. आणि मराठी सिनेमात त्याने बॅक टू बॅक हिट सिनेमे दिले, असे अशोक सराफ यांनी सांगितले.- स्वाती देसाई
Check Also
‘सैयारा’च्या यशाचे वेगळेपण
प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, …