ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये झाला. जगप्रसिद्ध संगीतकार, पोलंडचे रहिवासी असलेले पेड्रेवस्की अमेरिकेच्या दौर्यावर होते. त्यांच्या दौर्याचा उद्देश होतासंगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेणे. प्रत्येक वेळी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी चुरस असायची. मात्र, या वेळी त्यांनी एका साध्या लोहाराच्या तरुण मुलाकडे हे आयोजन करण्याची जबाबदारी दिली. हेतू असा होता की, या निमित्ताने त्याला काही आर्थिक मदत होईल. पण प्रतिस्पर्ध्यांच्या कारस्थानी डावांमुळे फारसे तिकीट विकले गेले नाहीत, आणि फार कमी लोक उपस्थित राहिले.
कार्यक्रम संपल्यानंतर तो तरुण त्या प्रसिद्ध संगीतकाराला भेटायला आला. त्याला कार्यक्रमाचे मानधन द्यायचे होते. सामान्यतः पेड्रेवस्कींच्या प्रत्येक कार्यक्रमातून आठ-दहा हजार डॉलर अगोदरच जमा होत असत. त्यापैकी दोन हजार डॉलर आयोजकाला मिळायचे. पण येथे एवढे परिश्रम करूनही कारस्थानी डावामुळे फक्त तीन हजार डॉलरच मिळाले. तीच रक्कम घेऊन तो तरुण त्यांना देण्यासाठी आला होता.
वृद्ध संगीतकारांनी विचारले, उरलेली रक्कम नाही मिळाली, तर हॉलचे भाडे वगैरे कसे भरशील? निराश तरुण म्हणाला, काही वर्षांत कष्ट करून चुकवीन. पेड्रेवस्की म्हणाले, ऐक! निराश होऊ नकोस. ही आणखी काही रक्कम घे. हॉलचे भाडे भर आणि नवीन व्यवसाय सुरू कर. त्यांनी त्याला त्याहून अधिक रक्कम दिली. या उपकारांनी भारावलेल्या डोळ्यांनी तो तरुण नम्रपणे वाकून निघून गेला. एकच शिकवण त्याच्या मनात राहिलीती म्हणजे, तूही असाच संवेदनशील रहा आणि इतरांना मदत करत जा.
काळ पुढे सरकला. तोच तरुण पुढे अमेरिकेचा अध्यक्ष झाला. लोक त्याला हर्बर्ट हूवर या नावाने ओळखू लागले. १९३० मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात जेव्हा युरोपातील देश अमेरिकेचे कर्ज फेडू शकत नव्हते, तेव्हा पोलंडचे संगीतकार पेड्रेवस्की आठवले. अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी पोलंडसह इतर राष्ट्रांना १० कोटी डॉलरची मदत दिली. हूवर यांना या कार्यासाठी आजही आठवले जाते. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं. मी आज जो काही आहे, तो त्या ख्यातनाम संगीतकारामुळेच आहे. मी फक्त माझं ऋण फेडलं आहे.
संवेदनशिल कसं असावं ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!
कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. …