अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाक्तया उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफफॉर्मवर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मित्र असूनही, भारत आणि अमेरिकेत फारसा व्यापार झाला नाही. लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे. कारण ते खूप जास्त शुल्क लादतात. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वांत कठीण व्यापार अडथळे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांशी व्यापार करासंदर्भात करार केले आहेत. भारताशीही अशा करारासंदर्भात बोलणी चालू आहेत. मात्र, ही बोलणी पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला २५ टक्के व्यापार कर लागू केला. काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले होते. त्यावर अनेक देशांमधून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. चीनने तर उलट अमेरिकेवरच १५० टक्के व्यापार कर लागू करत असल्याचे जाहीर केले. काही काळानंतर अमेरिका व चीनमध्ये व्यापार कराराबद्दल सहमती झाली व त्यांच्यातील टॅरिफ वॉर थांबले. भारतानेही यासंदर्भात अमेरिकेशी व्यापार कराराबाबत बोलणी चालू केली आहे. ही बोलणी अंतिम होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भारताला टॅरिफ लागू होण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते की जर दोन्ही देशांमधील व्यापाराबाबतची बोलणी संपून दोन्ही बाजूंनी सहमती न झाल्यास भारतावर २५ टक्क्यांपर्यंत व्यापार कर लागू होऊ शकतो, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प दिला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भारतावर कर लादला.
गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यामुळे युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. त्यामुळे, भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत आहे, हे अमेरिका आणि युरोपच्या डोळ्यात खुपत आहे. यामुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड लादला आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारत सरकारन एका निवेदनाद्वारे याबाबत प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची सरकारने नोंद घेतली असून, त्याचे काय परिणाम होतील, हे तपासले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात परस्पर हिताचे द्विपक्षीय व्यापार करार होण्यासाठी काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. त्यासाठी भारत कटिबद्ध आहेत, असेही यात म्हटले आहे. देशातील शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या संरक्षण आणि संवर्धन याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यूकेसोबत झालेल्या आर्थिक आणि व्यापार करारासह इतर करारांप्रमाणेच, सरकार आपल्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल, असे पीआयपीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Check Also
दिवाळीनंतर पालिका निवडणुकीचा बार
राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन वापरले जाणार …