जुलिया चाइल्ड यांना लहानपणापासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची आवड होती. त्यांच्या नव्या प्रयोगांमुळे पदार्थ अत्यंत चविष्ट बनत. एकेदिवशी त्यांनी ठरवले की त्यांनी शोधून काढलेल्या रेसिपी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यांनी आपल्या दोन महिला सहकार्यांसोबत मिळून एका पुस्तकाची योजना आखली. त्या पुस्तकाचे शीर्षक ठेवले ‘फ्रेंच कुकिंग फॉर द अमेरिकन किचन’
सहकार्यांसोबत त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून त्या पुस्तकावर पाच वर्षेकाम केले आणि ते ८५० पानांचे बनले. प्रकाशकाने इतया मोठ्या पांडुलिपीला नाकारत सांगितले, मला वाटत नाही की एवढ्या पानांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा धोका कोणी प्रकाशक घेईल. तुम्ही यात काही सुधारणा करू शकत असाल, तर मी ते प्रकाशित करण्याचा विचार करू शकतो.
जुलिया परत गेल्या आणि सहकार्यांसह पुन्हा त्या पुस्तकाचे संपादन सुरू केले. त्यांनी पांडुलिपी पूर्णपणे बदलून टाकली. यासाठी आणखी एक वर्ष लागले. मात्र प्रकाशकाने पुन्हा ते प्रकाशित करण्यास नकार दिला. तरीही जुलियाने हार मानली नाही. त्या सहकार्यांसह नवा प्रकाशक शोधण्यास निघाल्या. शेवटी, काम सुरू केल्यानंतर जवळपास आठ वर्षांनी, १९६१ मध्ये एका नव्या प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. पुस्तकाचे नाव ठेवण्यात आले
‘मास्टरींग द आर्ट ऑफ फ्रेंच कुकिंग’
हे पुस्तक प्रकाशित होताच धडाधड विकले जाऊ लागले. काही काळातच त्याच्या दहा लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. १९६६ साली ‘टाईम’ मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर जुलिया चाइल्ड यांचा फोटो प्रकाशित करून त्यांच्या चिकाटीचे कौतुक केले. त्यानंतर जुलिया चाइल्ड लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. त्यांच्या कुकिंगशी संबंधित अनेक कार्यक्रमांना टीव्हीवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आपण हार मानण्यास नकार दिल्यास फक्त यशच नाही, तर अपार यश मिळते ही बाब जुलिया चाईल्ड यांचे उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!
कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. …