लेख-समिक्षण

संघर्ष हीच यशाची हमी

ही यशोगाथा आहे सीड नायडू या असामान्य तरुणाची. अगदीच सामान्य असलेला सीड आज कोट्याधीश आहे. पण कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्यासाठी तो परिस्थितीसी झुंजला. त्याने स्वतःचा रस्ता जोखला. त्यावर तो टिकला आणि आज तो कोट्यवधी कंपनीचा मालक आहे.
कधीकाळी संघर्षाच्या गर्तेत अडकलेल्या सीड नायडूला आज ओळखीची गरज नाही. सीड प्रोडक्शन या नावाने त्याची मोठी कंपनी आहे. त्याने संकटाशी सामना केला. चिकाटी ठेवली. बेंगळुरुत सीड नायडू, सीड प्रोडक्शन नावाने अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि मीडिया प्रोडक्शन हाऊस चालवतो. कोट्यवधींचा टर्नओव्हर त्याचे प्रोडक्शन हाऊसकडे आज जगातील नामवंत कंपन्या आणि ब्रँड शूट आणि मार्केटिंग कॅम्पेन चालवतात. त्याच्या प्रोडक्शन हाऊसची कोट्यवधींची उलाढाल आहे. कोट्यवधींचा टर्नओव्हर करणार्‍या सीडला शिक्षण मात्र इयत्ता दहावीपर्यंतच पूर्ण करता आले. 2007 मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबाची जबाबदारी सीडच्या खाद्यांवर येऊन पडली. त्याची आई दरमहा केवळ 1500 रुपये कमावत होती. आईच्या मदतीसाठी सीडने घरोघरी जाऊन वृत्तपत्र विक्रीचे काम सुरु केले. त्यातून त्याला 250 रुपये महिना मिळत होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे सीडला पुढील शिक्षणाचा खर्च करता येणे अशक्य होते. दहावी झाल्यानंतर सीडने एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून नोकरी सुरु केली. त्यावेळी त्याचा पगार 3000 रुपये होता. स्वप्नांचा पाठलाग सीड कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याची तयारी करत होता. फॅशन इंडस्ट्रीजकडे त्याचे लक्ष वेधले. त्याने ऑफिस बॉयची नोकरी सोडली आणि एका कॉफी हाऊसमध्ये वेटर झाला. त्यानंतर एका मॉलमध्ये नोकरी केली. याठिकाणी फॅ शनेबल कपडे, त्यांचे मार्केटिंग, इवेंट मॅनेजमेंट याची त्याला माहिती मिळाली. फॅ शनच्या जगाशी त्याचा परिचय झाला. याच क्षेत्रात पुढे करिअर करायचे त्याने ठरवले. स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल दरम्यान सीडला अ‍ॅड शूटची ऑफर आली. पण त्यासाठी त्याला स्वतःची कंपनी आवश्यक होती. त्याच्याकडे दोन लाख रुपये होते. पाच लाखांची गरज होती. त्याने मित्र, नातेवाईक यांच्याकडून लाजत-काजत तीन लाख रुपये उसणे घेतले, ते लागलीच परत करण्याच्या बोलीवर. त्याने शब्द पाळला. मोठ्या कष्टाने त्याने सीड प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. यानंतर त्याच्याकडे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, चुंबक, ग्लोबल देशी, युएस पोलो, वीवो, डाबर, फ्लाईंग मशीन सहित अनेक कंपन्या आल्या. त्यांचे फॅशन शूट, स्टोअर लॉचिंग आणि इवेंट्सचे काम सीड प्रॉडक्शनाला मिळाले.
आपण आपल्या स्व्नाच्या दिशेने सतत संघर्ष करत राहिल्यास यशाचे शिखर गाठू शकतो ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *