मुलीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. पूर्वी आजी आजोबा हे नातवासाठी खाते सुरू करत असत. मात्र नव्या मागदर्शक सूचनेनुसार केवळ कायदेशीर पालकच (आई वडिल) खाते सुरू करू शकतात आणि बंद करू शकतात. म्हणून आजी-आजोबांनी सुरू केलेल्या जुन्या खात्यांना आई वडिलांच्या नावावर स्थानांतरित करावे लागेल. यासाठी बेसिक अकाउंटचे पासबुक, मुलीचे वय आणि नात्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र आणि अन्य कायदेशीर कागदपत्रे, आई वडिल किंवा पालक यांचे सरकारी ओळखपत्र. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट ही कागदपत्रे गरजेची आहे. याबाबतचा अर्ज टपाल कार्यालय किंवा बँकेत मिळेल. तुम्ही ज्या ठिकाणी खाते सुरू केले असेल, तेथे हा अर्ज मिळतो आणि त्यात सविस्तर माहिती नमूद करून नाव स्थानांतरित करण्याची प्रक्रिया करू शकतो.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …