फेस सीरम लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
1. फेस सीरम लावल्यानंतर चेहर्याला सनस्क्रीन लावा.
2. सीरमचे थेंब मर्यादित प्रमाणातच वापरा जास्त प्रमाणात सीरम वापरल्याने देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते.
3. फेस सीरम लावल्यानंतर खूप वेगाने चेहर्याला मसाज करण्याची चूक करू नका.
सीरम वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट अवश्य करा.सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेस सीरम त्वचेवर टोनर लावल्यानंतर लावावे. सीरम चेहर्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा, ज्यामुळे सिरम वाया जाणार नाही. सीरम बोटाना रगडून हलक्या हाताने चेहर्यावर लावा. त्यानंतर चेहर्याला मॉईस्चराईजर लावा.चेहर्याला ग्लो येण्यासाठी आणि त्वचा निरोगी बनण्यासाठी तुम्हाला सीरमचा नियमित वापर करावा लागेल. फेस सीरम हे पातळ आणि हलकं असल्याने त्वचेत लगेच मुरते. सीरम त्वचेला हायड्रेट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे चेहर्यावर ग्लो दिसू लागतो. सीरम हे एक अँटी एजिंग मेकअप प्रॉडक्ट आहे. यामुळे त्वचेचा सैलपणा आणि सुरकुत्या कमी होतात. फेस सीरम चेहर्याची चमक वाढवते त्यामुळे व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम निवडा. फेस सीरम त्वचेची हानी भरून काढण्याचे काम करते. रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहर्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. अशा वेळी फेस सीरमचा वापर लाभदायी ठरतो.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …