लेख-समिक्षण

व्यक्तिमत्व खुलवताना

रंगरूप कसे असावे हे आपल्या हातात नसते. मात्र त्यानुसार आपल्या राहणीमानात जाणीवपूर्वक बदल केला तर व्यक्तिमत्व नक्कीच आकर्षक बनू शकते. ज्यांना निसर्गतःच उजळ रंग आणि चांगली उंची लाभली असेल अशा व्यक्तींनी गडद किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यांना खरं तर कुठलीही फॅशन चांगली दिसते. पण उंची कमी असेल तर आडव्या डिझाईनचे कपडे निवडू नयेत. त्याऐवजी उभ्या रेषा असणारे डिझाईन निवडावे. यामुळे उंची अधिक भासते. तसेच सलवार-कमिजच्या कुर्त्याची लांबी कमी ठेवावी.
पोटरीपर्यंत किंवा पायघोळ कुर्तेअशा व्यक्तींना चांगले दिसत नाहीत. उंची कमी असणार्‍यांनी जीन्स घालताना त्यावर लहान टॉप घालावा. यामुळे उंची कमी भासत नाही.
जास्त बारीक असणार्‍यांनी सरळ रेषांचे डिझाईन असलेले कपडे घालू नयेत. त्याऐवजी डिझायनिंग चेक्स किंवा फ्लोरल प्रिंटचे कपडे घालावेत. चेहरा रुंद असेल आणि त्वचा उजळ असेल तर प्रिंटेड डिझाईनचे कपडे अशा व्यक्तींना शोभून दिसताते. गोर्‍या रंगाला, लाल, निळा, हिरवा, काळा असे रंग उठून दिसतात. तर सावळ्या रंगाच्या लोकांनी हलक्या शेडचे कपडे निवडावेत. अ‍ॅक्सेसरी निवडतानाही आपल्या व्यक्तिमत्वाचा जरूर विचार करावा. जाड व्यक्तींनी हेवी अ‍ॅक्सेसरी वापरू नये. त्यांनी मध्यम आकाराच्या अ‍ॅक्सेसरीज वापराव्यात. तसेच सावळ्या वर्णाच्या व्यक्तींनीदेखील हलक्या आणि फारशा भडक नसलेल्या अ‍ॅक्सेसरीज वापराव्यात.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *