हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, परीक्षेच्या विषयांची योग्य निवड करत दररोजच्या अवघ्या काही तासांच्या मेहनतीतून एकहाती यश खेचून आणले आहे. विशेष म्हणजे त्यांनी रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये आपली नोकरी सांभाळून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इतकेच नव्हे तर ऑल इंडियामध्ये 59वे स्थान देखील पटकावले आहे. सध्या आईएएस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि आगामी काळात केंद्रीय प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असणार्या यशनी नागराजन यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
यशनीने तिचे सुरुवातीचे शिक्षण आंध्र प्रदेशातील नहरलागुन येथील केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केलं. यानंतर त्यांनी 2014 मध्ये युपिया येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी या पदावर अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्या आयएएस होईपर्यंत तिथेच कार्यरत राहिल्या. यशनी यांची निवड लाखो तरुणांना सांगते की सध्याची नोकरी न सोडताही उत्तम वेळेचे व्यवस्थापन करून स्पर्धा परीक्षांमध्ये एकहाती यश मिळवता येते. नोकरी करत असताना यशनी यांनी युपीएससीची तयारी सुरू केली. दरम्यानच्या काळात अनेकांनी त्यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी तो मान्य केला नाही. स्वतःच्या बळावर यश मिळवण्याच्या ध्यासाने यशनी यांनी धीर सोडला नाही. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अखेर आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
यशनी यांनी आपली नोकरी करत असताना ऑफिसमधून घरी परतल्यावर परीक्षेच्या तयारीसाठी त्या दरोरज ठरवून दिलेल्या वेळेत चार ते पाच तास अभ्यास करत होत्या. सरकारी सुट्टीत त्या बारा ते चौदा तास अभ्यास करायच्या. यशनी यांचा असा विश्वास आहे की उत्तम वेळेचे व्यवस्थापन सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करतं. त्यांचे असे म्हणणे आहे की, काम करताना मनाची तयारी असेल तर परीक्षा आणि तयारीशी संबंधित ताण कमी होतो. नोकरी तुम्हाला खात्री देते की तुमच्या करिअरबद्दल काळजी करण्याची गरज नाही आणि तणावाशिवाय तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात तुम्हाला मदत होते.असेही त्या सांगतात. यशनी या सांगतात की, परीक्षेची तयारी करण्यापूर्वी स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. अनेकदा लोक इतरांच्या सल्ल्याने असे विषय निवडतात जे त्यांना यशाचा मार्ग मोकळा करतात पण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. असेही त्या सांगतात.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …