लेख-समिक्षण

निरीक्षणशक्ती महत्वाची

जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. त्यावेळी जेन्नरच्या खेड्यातील अनेक लोकांनी आश्चर्यकारकपणे साथीच्या आजारापासून स्वतःला बचावले होते. या ग्रामीण जनतेला हे माहीत होते की, काऊपॉक्स झालेल्या रोग्याला देवीचा रोग होत नाही. हा रोग प्रथम गायींवर आक्रमण करतो, त्यामुळे त्याला ‘काऊपॉक्स’ म्हणतात.
गायींपासून हा रोग माणसांना होतो. मग या रोगाबाबत असा प्रश्न निर्माण होतो की, याची लागण फक्त गाईंनाच का होते? घोड़े व अन्य पशूंना का होत नाही? हंटर यांनी प्रोत्साहित केल्यामुळे जेन्नर यांनी आपले संशोधन काऊपॉक्सवर केंद्रित केले. त्यांनी जेम्स फिक्स नावाच्या 8 वर्षाच्या मुलावर निरीक्षण आणि कल्पनेच्या मदतीने 1796 मध्ये प्रयोग सुरु केले. त्या मुलाच्या हातावर दोन बारीक जखमा झाल्या. गायीच्या चिकनपॉक्सच्या पुरळांच्या स्त्रावासह ते मिसळले. त्यानंतर मुलाला थोडा ताप आला; परंतु काही दिवसानंतर तो पूर्णपणे बरा झाला.काही आवड्यानंतर मुलाला पुन्हा एकदा देवीचे पुरळ आले.
त्यानंतर जेन्नर यांनी देवीच्या फोडातून काढलेल्या लसिकेचे इंजेक्शन त्याला दिले. परंतु नंतर त्या मुलाला देवीचा आजार झाला नाही. तेव्हा जेन्नर यांनी आपले निष्कर्ष घोषीत केले. पुढे आपल्या संशोधनाचा विस्तृत अहवाल जाहीर करून जगासमोर देवीची लस सादर केली.
जेन्नर 1802 मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् अँड सायन्सच्या परदेशी सन्मान सदस्य 1804 मध्ये अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचा सदस्य आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचा परदेशी सदस्य म्हणून निवडले गेले. जेन्नर यांच्या त्या लसीसाठी सर्व जग त्याचे आभारी राहील.
जेन्नर यांनी शोधलेल्या लसीमुळेच आज देवीमुक्त समाज अस्तित्वात आला हे खरे नाही काय?

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *