अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशियाचे असे दोन भाग अतिशय थंड प्रदेेश म्हणून ओळखले जातात. या दोन्हींमध्ये बियरिंग स्ट्रेट अर्थात पाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर दोन अनोखे बेट आहेत. यातील पहिला बेट बिग डायोमिड. हे दोन्ही बेट एकमेकांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत. पण, तरीही या दोन्ही बेटात एक इतका मोठा फकर आहे की, एकमेकांपासून इतके जवळ असताना देखील त्यांच्या प्रमाणवेळेत थोडाथोडका नव्हे तर चक्क 21 तासांचा फरक आहे.
अमेरिका आणि रशिया तसे एकमेकांपासून जवळच आहेत. अलास्का आणि सायबेरिया यांच्यातील अंतर तर फक्त 82 किलोमीटर आहे. यात अगदी एकमेकांपासून जवळ असे बिग डायोमिड आणि लिटल डायोमिड अमेरिकेचा भाग आहे तर बिग डायोमिड रशियाचा भाग आहे. या बेटांवर काही लोक राहतात आणि ते सहजपणे या बेटापासून त्या बेटापासून त्या बेटापर्यंत ये-जा देखील करू शकतात. पण, आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही बेटांवरील प्रमाणवेळेत चक्क 21 तासांचा फरक आहे. यामुळे एखादी व्यक्ती एका बेटावरून दुसर्या बेटावर जात असताना एक तर ती वेळेपेक्षा मागे पडते किंवा वेळेपेक्षा पुढे जाते! याच कारणांमुळे या दोन्ही बेटांना यस्टर्डेअँड टुमारो आयलँड या नावानेही ओळखले जाते!
आता या दोन्ही बेटातील प्रमाणवेळेत इतका फरक का आहे, ते ही जाणून घेऊया. मूळत: हा फरक अमेरिका आणि रशिया यांच्यातील मेरीटाईम बॉर्डर आणि इंटरनॅशनल डेटलाईनमुळे येतो. येथे बिग डायोमिट प्रमाणवेळेनुसार पुढे चालते आणि त्याला ‘टुमारो आयलँड’असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय तिथी रेषा ही प्रशांत महासागराच्या मध्यातील एक काल्पनिक रेषा आहे. ती पार करत असताना प्रमाणवेळेत फरक पडत जातो. या दोन्ही बेटांमध्ये छोट्या बेटावर 100 लोक राहतात तर मोठ्या बेटावर एकाही व्यक्तीचे वास्तव नाही. या मोठ्या बेटावरील लोक दुसर्या महायुद्धादरम्यान रशियामध्ये स्थलांतरित झाले होते.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …