लेख-समिक्षण

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण

मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन शांतपणे संपवले आणि मला जवळ घेवून माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले.
मला आता आठवत नाही मी त्यांना तेव्हा काय सांगीतले होते. पण एक गोष्ट मला आजही आठवतेय, ती म्हणजे करपलेल्या भाकरीबद्दंल आईने मागीतलेली माफी….! यावर बाबांनी दिलेलं उत्तर मी कधीच विसरलो नाही. माझे बाबा खुप समजूतदारपणे माझ्या आईला म्हणाले, असे काही नाही ग, मला करपलेली भाकरी खुप आवडते… झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्यांना विचारले, खरंच तुम्हाला करपलेली, जळालेली भाकरी आवडते का..? त्यानी मला खुप प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, तुझी आई दिवसभराच्या कामाने खुप थकून गेलेली असते. करपलेल्या भाकरीने मला कोणताच त्रास होणार नाही,पण मी जर त्याबद्दल तिच्यावर ओरडलो तर तिच्या हृदयाला खुप वेदना होतील.
बेटा, तुला माहीत आहे का, आयुष्य खुपशा अपरिपूर्ण गोष्टीने भरलेलं आहे आणि मी पण परिपूर्ण नाही. मी माझ्या आयुष्यात इतर सोहळे विसरलो तरी एक गोष्ट कायम हृदयावर कोरून ठेवलीय. प्रत्येक नाते जपण्यासाठी एकमेकांचे दोष स्विकारायचे आणि नात्यांचा आनंद घेत रहायचे. आयुष्य खुप छोटे असते. जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात त्यांच्यावर प्रेम करा. जे देत नाहीत त्यांच्या बद्दल मनात आत्मीयता ठेवा …!!

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *