लेख-समिक्षण

श्रमसातत्य महत्वाच्ं

प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात. सगळेच ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात असेही नाही. पण म्हणून त्यांचे प्रयत्न कधीच थांबत नाही. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण स्वतःचे व्यवसाय सुरु करुन त्यांच्या मोठ्या स्वप्नांची बीजे रोवत आहेत. व्यवसाय सुरु करणे एवढे सोपे नाही. हा रस्ता प्रचंड संयम पाहणारा आणि कष्टदायक असतो.
स्वतःच्या क्षमतेबद्द्ल मनात कितीही शंका डोकावून गेल्या तरी नेहमी प्रोत्साहीत राहून प्रयत्न करत राहायला हवे. “सीओईपी”मधून नगर नियोजनासारख्या नवीन विषयात पदवी घेऊन या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वप्नीलने वयाच्या 22व्या वर्षीच स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं ठरवलं.
या नवीन क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी त्याने माळीण गाव पुनर्वसनाच्या लेआऊट योजनेत हातभार लावला. यासाठी स्वप्नील आणि त्याचे दोन मित्र सलग दोन महिने काम करत होते. तब्बल 28 वेळा त्यांच्या योजना राज्य शहर नियोजन विभागाला पाठवल्यानंतर त्यांच्या नियोजनाला संमती देण्यात आली. देशातील सर्वात कमी कालावधीत म्हणजेच तीन वर्षात पूर्ण झालेला हा एकमेव पुर्नवसन प्रकल्प आहे. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना स्वप्नीलने काही निवडक कंपन्यांसोबत काम करुन अनुभव गोळा केला. तसेच “ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र” या स्पर्धेत तब्बल सहा हजार संघांमधून स्वप्नील व त्याचा संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत त्यांनी ’प्रशासनातील लोकांचा सहभाग’ या थिमअंतर्गत सर्वसामान्यांपर्यंत बजेट सोप्या पद्धतीने पोहचण्यासाठी अ‍ॅप तयार केलं. या अ‍ॅपमध्ये सामान्य माणसांना बजेट विषयी आपली मते मांडणे शक्य झाले. सध्या तो विविध शहरात नगर विकास आराखडा आणि शहर स्वच्छता योजनेचे काम करतो आहे.
स्वप्नीलने 22व्या वर्षी एकाच गोष्टीसाठी 28 वेळा प्रयत्न केलेत, यावरुन त्याचे श्रमसातत्य स्पष्ट होत नाही काय?

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *