एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांची वर्तणूक. घरामध्ये असणार्या आजी-आजोबांशी आपले बाबा-आई जर सतत भांडत असतील, उरमटपणाने बोलत असतील किंवा ऑफिसमधल्या सहकार्यांशी फोनवरुन उच्चरावाने बोलत असतील तर मुले त्यांचे अनुकरण करु शकतात.
मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना उत्तम सवयी लावणे हे पालकांचे परमकर्तव्य मानण्यात येते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोप्पे जाते. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा विचार, वागणूक आणि व्यवहार यात फरक जाणवू लागतो.
काही मुलांमध्ये मोठ्यांचा अनादर, सतत राग, हट्टीपणा, जबाबदारीने न वागणे अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागतात. या वागण्यावर सुरुवातीपासून नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात त्याच्या व्यक्तिमत्वावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या मुलांमध्ये जर असा फरक जाणवत असेल तर काही गोष्टी लक्षात घ्या.
तुमच्या मुलाने अचानक गैरवर्तन करायला सुरुवात केली तर त्याने कोणाशी मैत्री केली आहे ते पहा. त्याचा मित्रपरिवार कोण आहे ते जाणून घ्या. कारण बरेचदा वाईट संगतीचे परिणाम हे मुलांवर होत असतात.
दुसरी गोष्ट म्हणजे मुले मोबईल, टीव्हीवर काय पाहत आहेत याकडेही लक्ष गरजेचे आहे. यावरून तुम्ही त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवू शकता.
मुलांसाठी नियम बनविणे आणि ते पाळायला लावणे अत्यंत महत्वाचे आहे. मुले ऐकत नसतील तर चांगल्या शब्दांत आणि प्रेमाने मुलांना नियमांचे महत्त्व पटवून द्या. यामुळे त्यांचा राग आणि उद्धटपणा नक्कीच कमी होईल. काहीही झाले तरी मुलांना मारणे टाळा, नाहीतर मूल आणखी बिघडण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या उद्धट वागण्यामागे मूल एखाद्या गोष्टीमुळे नाराज किंवा त्रासलेले नाही ना याचीही खातरजमा करा. मुलांच्या मनात नक्की काय आहे? हे जाणून घ्या. यामुळे मुलांच्या वागण्यातील बदल सुधारण्यास मदत होईल.
अनेक मुलांची चिडचिड, त्यांचा उद्धटपणाला काहीवेळा पालकांचा वेळ न मिळणे हे कारण असू शकते. हल्ली आई-बाबा दोघेही कामाला असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यांना हवा तसा वेळ मुलांना देता येत नाही. पण, याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत वेळ घालविणे अत्यंत गरजेचे आहे.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …