जगभरातील लोकांच्या आहारात कांदा असतोच. गरिबांसाठीही कांदा- भाकर हे सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. कांद्याचा वापर मेसोपोटेमियात म्हणजे सध्याच्या इराक-इराणच्या परिसरात 4000 वर्षांपूर्वी केला जात असे, हे एका लेखातून स्पष्ट झाले आहे. 1985 साली एका फ्रेंच पुरातत्त्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. जगभरातल्या एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला जातो. परंतु, कांदा सर्वाधिक खाणार्या लोकांमध्ये मात्र हे देश नाहीत. येल विद्यापिठातील बॅबिलोनिया संग्रहातील एका मृत्तिकापटावर लिहिलेल्या 3 लेखांमधील एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना पाककलेचे जगातील सर्वात जुने पुस्तक मानले जाते.
त्यावरील मजकुराचा अर्थ 1985 साली उलगडला गेला. मेसोपोटेमियाची संस्कृती, इतिहास आणि पुरातत्त्व याचे अभ्यासक आणि स्वयंपाकाची आवड असणारे ज्यां बोटेरो यांना हा अर्थ उलगडण्याचे शेय दिले जाते. या मृत्तिकापटावर अनेक जुन्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची पाककृती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळेस एक पदार्थ लोकांना जास्तच आवडायचा तो म्हणजे कांदा. कांदा वर्गातील भाज्या तेव्हाच्या लोकांना जरा जास्तच आवडायच्या असे बोटेरो सांगतात. मेसोपोटेमियामधले लोक पदार्थांमध्ये कांदा, कांद्याची पात, लहान कांदे आणि लसणाचा वापर करत.
कांद्यावरचे हे प्रेम आज 4000 वर्षेझाली तरी कायम आहे. कांद्याचा उल्लेख नसलेले पाककृतीचे पुस्तक सापडणे कठीणच आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार जगातील सुमारे 175 देश कांदा पिकवतात. गहू पिकवणार्या देशांपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे. बहुतेक विशेष पदार्थांत कांदा वापरला जातोच. काही लोकांच्या मते, कांदा हे एकमेव वैश्विक खाद्य आहे. खाद्यपदार्थांचे इतिहासकार आणि ‘द सिल्करोड गुर्मे’च्या लेखिका लॉरा केली सांगतात, ‘जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर कांदा हा मध्य आशियातून आला असे आम्ही मानतो. अशात मेसोपोटेमियामध्ये त्याचा झालेला वापर पाहता त्याकाळापर्यंतही कांद्याने भरपूर प्रवास केलेल्याचे दिसते. युरोपात कांस्ययुगात कांद्याचा वापर होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. ‘केली सांगतात, ’2000 वर्षेआधी रेशीम मार्गावर कांद्याचा वापर होत होता यात शंका नाही. तेव्हापर्यंत मेसोपोटेमियाच्या लोकांनी आपल्या कांद्याच्या पदार्थांचा इतिहास लिहित होते. ‘प्रतिव्यक्ती कांदा खाण्याचे सर्वाधिक प्रमाण लिबियात आहे. 2011 साली संयुक्त राष्ट्राने केलेल्या पाहणीत लिबियातील प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सरासरी 33.6 किलो कांदा खाते.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …