आजघडीला सर्वच मंडळी व्हॉटसअप वापरणे महत्त्वाचे समजतात. कारण व्हॉटसअप हे केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नसून महत्त्वाच्या निरोपासाठी देखील त्याचा वापर उपयुक्त ठरत आहे. मग ते काम सरकारी असो किंवा खासगी असो, संबंधितांपर्यंत थेट संदेश पाठवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच व्हॉटसअपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची वाढती रुची लक्षात घेता व्हॉटसअप देखील नवनवीन फिचर सातत्याने आणत आहे. त्यामुळे या अॅपचे नाविण्य टिकून राहिले आहे. अधिकाधिक यूजरफ्रेंडली करण्यासाठी निर्मात्याचा कल राहिलेला आहे. व्हॉटसअपमध्ये होणार्या बदलाचा यूजरला चांगला अनुभव येईल, याचीच खबरदारी घेतली जाते. व्हॉटसअपवर आपल्या चॅटचा बॅकअप सहजपणे घेता येतो. अर्थात यासंदर्भात व्हॉटसअपने यूजरला दिलेल्या इशार्यानुसार जो बॅकअप वर्षभरापासून अपडेट झालेला नाही तो गूगल ड्राईव्हने आपोआप डिलिट होईल, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर व्हॉटसअपने डेटा डिलिट करण्यासही प्रारंभ केला आहे. जर बॅकअप केलेला आपले डेटा अद्याप डिलिट झालेला नसेल आणि तो सुरक्षित ठेवायचा असेल तर आपणही व्हॉटसअप डेटाचा बॅकअप अपडेट करू शकता.
बॅकअपचा सोपा उपाय : फेसबुकच्या इंस्टंट अॅप व्हॉटसअपने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये गूगलसमवेत करार केला होता. यानुसार व्हॉटसअप यूजरचा डेटा हा गूगल ड्राइव्ह क्लाऊड सर्व्हिस मध्ये स्टोर करण्याचा विषय होता. यानुसार आपण फोन जरी बदलला तरी यूजर नव्या फोनवर सहजपणे गूगल ड्राइव्हपासून बॅकअप रिलोड करू शकतो. ज्यांनी आतापर्यंत डेटाचा बॅकअप केलेला नाही अशा यूजरला व्हॉटअसपचा हा मोठा निर्णय अडचणीत आणू शकतो.
सध्या सोशल मेसेजिंग अॅप : व्हॉटसअप फॉरवर्ड प्रिव्यू फिचर टेस्ट करत आहे. यातून व्हॉटसअप यूजरला आता टेक्स्ट, इमेज, जीआयएफ, व्हीडिओ अन्य कंटेट एकापेक्षा अधिक यूजरला पाठवण्यापूर्वी आणखी एक स्टेप फॉलो करावी लागते. एवढेच नाही तर स्टेप जोडल्यानंतर यूजर लिस्टमध्ये अन्य यूजरला जोडणे आणि त्यामधून काढून टाकणे यासारखे गोष्टी करता येणे शक्य होणार आहे. जर आपण आपल्याला डेटाचा बॅकअप करायचा नसेल तर आपल्याला काही पायर्या पूर्ण कराव्या लागतील. सर्वात अगोदर व्हॉटसअप सुरू करा. त्यानंतर उजवीकडे तीन डॉटवर क्लिक करा. त्यात सेटिंग्जमध्ये चॅटिंगचा पर्याय निवडून चॅट बॅकअपवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला चॅटचा बॅकअप मिळेल.
Check Also
फेसबुकवरुन व्यवहार करताना…
फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे …